Pune News: सासू सरपंच, सासरे मुख्याध्यापक; चौधरी कुटुंबात सुनेचा छळ, गर्भपातही केला; त्रासलेल्या दिप्तीनं आयुष्य संपवलं

Pune Dipti Chaudhari Case: पुण्यातील ऊरूळी कांचनमध्ये दिप्ती चौधरी नावाच्या विवाहितेने गळाफस घेत आयुष्य संपवलं. सासरच्यांकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने आयुष्य संपवलं.
Pune Crime: सासू सरपंच, सासरे मुख्याध्यापक; चौधरी कुटुंबात सुनेचा छळ, गर्भपातही केला; त्रासलेल्या दिप्तीनं आयुष्य संपवलं
Pune Dipti Chaudhari CaseSaam Tv
Published On

Summary -

  • पुण्यातील हडपसरमध्ये दीप्ती चौधरीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली

  • लग्नात ५० तोळे सोनं आणि ३५ लाख रुपये देऊनही हुंड्यासाठी छळ

  • गर्भलिंग तपासणी करून गर्भपात करण्यास भाग पाडले

  • सासू सरपंच आणि सासरे मुख्याध्यापक असूनही त्यांनी हुंड्यासाठी छळ केला

  • आरोपींना पोलिसांनी अटक केली

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणासारखीच आणखी एक धक्कादायक घटना घडली. सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यातील हडपसर भागातील एका विवाहितने आयुष्य संपवलं. दीप्ती चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव होते. लग्नात ५० तोळे सोनं, ३५ लाखांची रोकड देऊनही सासरच्यांनी दिप्तीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. मुलगी झाल्यामुळे सासरचे नाराज होते. या सर्व छळाला कंटाळून दिप्तीने आपल्या ३ वर्षांच्या मुलीसमोर गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर घेणार दीप्तीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

याप्रकरणी दीप्तीचा पती रोहन चौधरी, सासरे कारभारी चौधरी, सासू सुनीता चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांना पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे सुनीता चौधरी या पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी गावच्या सरपंच आहेत. तर सासरे कारभारी चौधरी हे मुख्याधपक आहेत. उच्चशिक्षित कुटुंबात दिले असताना देखील त्यांनी केवळ हुंड्यासाठी दिप्तीचा छळ केला आणि तिचा जीव घेतला.

Pune Crime: सासू सरपंच, सासरे मुख्याध्यापक; चौधरी कुटुंबात सुनेचा छळ, गर्भपातही केला; त्रासलेल्या दिप्तीनं आयुष्य संपवलं
Pune Crime: पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला, कारने धडक दिली; नंतर डोक्यात दगड घातला

२०१९ मध्ये दीप्ती आणि रोहन यांचे लग्न झाले होते. मात्र त्यानंतर सलग ६ वर्षे विविध कारणांनी दीप्तीला सासरचे सर्व जण मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. आधी व्यवसाय सुरू करण्यासाठी नवऱ्याने दीप्तीला १० लाख रुपये मागितले होते. त्यानंतर लग्नात हुंडा न दिल्यामुळे सासरचे सर्व जण तिला हिणवायला लागले. पुढे दिप्तीच्या आई वडिलांनी मुलीच्या सुखासाठी जावयाला कार खरेदी करण्यासाठी २५ लाख रुपये दिले. त्यानंतर सुद्धा तिचा छळ सुरूच राहिला होता.

Pune Crime: सासू सरपंच, सासरे मुख्याध्यापक; चौधरी कुटुंबात सुनेचा छळ, गर्भपातही केला; त्रासलेल्या दिप्तीनं आयुष्य संपवलं
Pune Crime : पत्नीने सोन्याचे दागिने मागितले, पतीने भर रस्त्यात केली निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

दरम्यान, दीप्तीला मुलगी झाली त्यामुळे तिचे सासरचे नाराज होते. मुलगी झाली ही गोष्ट तिच्या सासरच्या मंडळींना पटली नसल्यामुळे सुद्धा तिचा अनेक वेळा त्यांनी अपमान केला. पुढे तिच्याच माहेरच्यांनी दिलेले ५० तोळे दागिने सासू सासऱ्यांनी बँकेत गहाण ठेवले असल्याचं दीप्तीला सांगितलं. वारंवार तिचा छळ करत माहेरून पैसे आणण्यासाठी तिला जबरदस्ती केली जात होती.

Pune Crime: सासू सरपंच, सासरे मुख्याध्यापक; चौधरी कुटुंबात सुनेचा छळ, गर्भपातही केला; त्रासलेल्या दिप्तीनं आयुष्य संपवलं
Pune Crime : पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते धंदे; पोलिसांनी सापळा रचला अन् पुढे जे घडलं ते...

२०२५ मध्ये दीप्ती पुन्हा गरोदर राहिल्यावर तिच्यावर दबाव टाकत तिला गर्भलिंग तपासणी करायला लावली. या तपासणीत तिला मुलगी होणार हे कळताच नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त करत पुन्हा तिचा छळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तिच्यावर दबाव टाकत गर्भपात करायला लावला. अखेर २४ जानेवारीलाया सगळ्या जाचाला कंटाळून दीप्तीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

Pune Crime: सासू सरपंच, सासरे मुख्याध्यापक; चौधरी कुटुंबात सुनेचा छळ, गर्भपातही केला; त्रासलेल्या दिप्तीनं आयुष्य संपवलं
Pune Crime: पुण्यात टोळक्यांचा धुडगूस, दुकानाची तोडफोड; शिवीगाळ करत बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com