Maharashtra Live News Update: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

शेतकरी मजुरांनी केले प्रकाश आणि मोबाईल चार्जसाठी जुगाड पहा

पोटाची खळगी भरण्यासाठी शेत शिवारात काम शोधत भटकंती करणाऱ्या वनमजुरांनी झोपडी मध्ये लख्ख प्रकाश आणि मोबाईल मध्ये चार्जिंग करण्यासाठी भन्नाट जुगाड केले आहे, हिंगोली तालुक्यातील ईसापुर रमण्याच्या जंगलात या मजुरांनी सोलार प्लेटच्या मदतीने झोपडी मध्ये प्रकाशाची व्यवस्था केली आहे, दिवसभर पोट भरण्यासाठी कष्ट करून आल्यानंतर रात्र झोपडी मधील अंधारात काढणाऱ्या या मजुरांनी जुगाड केल्याने आता मात्र त्यांना प्रकाश मिळू लागला आहे.

कुडाळ पणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग

कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा येथील सिद्धिविनायक इंटरप्राईजेस या हार्डवेअर दुकानास आग लागण्याची घटना मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. या दुकानास लागलेल्या आगीत प्लास्टिक, पाईपस व इतर सामान जळून खाक झाले. दुकानाला लागलेली आग एवढी मोठी होती की, लोखंडी पाईप्स, अँगल पूर्णतः वाकून गेले. तर या आगीत टाटा कंपनीच्या डीआय वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली याचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.

उपसरपंच जमील पटेल यांचे ग्रामपंचायत समोर २६ जानेवारीपासून आमरण उपोषण

अमरावती जिल्ह्यातील दारापूर व खेलनागवे परिसरात सन फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शासकीय निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप दारापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच जमील पटेल यांनी केला आहे. संबंधित कामे ठेकेदार विलास बननोटे यांनी केली असून,या कामांचा दर्जा अत्यंत निष्कृष्ट असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या आहेत.

आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ थोड्याच वेळात घाटनदेवीहून मुंबईकडे कूच करणार

- नाशिकहून निघालेलं आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ थोड्याच वेळात घाटनदेवीहून मुंबईकडे कूच करणार

- रात्री घाटनदेवी परिसरात कडाक्याच्या थंडीत आदिवासी शेतकऱ्यांचा मुक्काम

- सध्या आदिवासी आंदोलकांची चहा, नाश्ता बनवण्याची लगबग

- नाश्ता झाल्यावर आदिवासी आंदोलक थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होणार

Maharashtra Live News Update: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

दहावी- बारावीची परीक्षा उंबरड्यावर आली आहे.या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून यंदा दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी तर बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियान राबवले जाते यंदाही हे अभियान राबवले जाणार आहे.सध्या सरावा तसेच प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहे.लेखी परीक्षेसाठी मोजके दिवस शिल्लक असल्याने शिक्षकांकडून परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

रायगडात महायुती फुटण्यास सुनील तटकरे जबाबदार

नगर पालिकेप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देखील रायगड जिल्ह्यात महायुती होण्याची शक्यता मावळली आहे. आणि याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुनील तटकरे यांनीच केलं आहे कारण त्यांना शिवसेना आणि भाजपची जी पारंपारिक युती आहे ती होऊ द्यायची नव्हती, असा गंभीर आरोप आमदार दळवी यांनी केलाय.

अजित पवार गटाचा भाजपला धक्का

कर्जत येथील भाजपचे युवा पदाधिकारी सागर शेळके यांनी अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळे स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला फायदा होणार आहे त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का आहे अनेक पदाधिकाऱ्यांनी युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अजित पवार गटांमध्ये पक्षप्रवेश केलाय त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय

महापौर निवड, गट नेते पदासाठी भाजपची आज पुण्यात बैठक

भाजपच्या सर्व नगरसेवकांची उपस्थितीत बैठक

पुणे महानगरपालिकेत गटनेता ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक

पुण्यात भाजपच्या 119 नगरसेवकांचा झाला विजय

निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसोबत स्थानिक नेते घेणार बैठक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com