ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साबूदाणा पापड हा एक लोकप्रिय स्नॅक आहे जे उपवास असल्यावरसुध्दा खाल्ले जाते. हे पापड एकदम कुरकुरीत असतात. तुम्ही घरी सोप्या पद्धतीने हे पापड बनवून ठेवू शकता.
साबुदाणे, पाणी, जीरे आणि मीठ इत्यादी साहित्य लागते. साबुदाणे ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा.
भिजवलेले साबुदाणे मॅश करून पेस्ट बनवा, त्यात मीठ आणि जिरे घाला आणि मिश्रण गरम पाण्यात टाकून घट्ट होईपर्यंत शिजवा.
शिजवलेल्या मिश्रणाला प्लास्टिकच्या शीटवर चमच्याच्या साहाय्याने छोट्या आकारात पातळ मिश्रण टाकत समान पध्दतीने पापड पसरवा.
पापडांना सुकण्यासाठी उन्हात ठेवा. पापडांना पुर्णपणे सुकू द्या.
सुकलेल्या पापडांना प्लास्टिकच्या शीटवरुन हळूच एक-एक करुन काढा. काढल्यावर पापड न तुटता एअरटाईट डब्यात स्टोर करुन ठेवा.
एका भांड्यात तेल घ्या तेल गरम करा आणि त्यात पापड टाकून ते तळून घ्या. पापड चांगले फुलतील असे तळा कच्चे तळू नका.
कुरकुरीत आणि क्रिस्पी साबुदाणा पापड तयार आहे. हे पापड तुम्ही रोजच्या जेवणासोबत सुध्दा खाऊ शकता. तसेच उपवासाला आवडती चटणी बनवून त्यासोबत साबुदाणा पापड खाऊ शकता.