IND vs AUS saam tv
Sports

IND vs AUS: बॉक्सिंग डे टेस्टमधून शुभमन गिलला बाहेरचा रस्ता; नवख्या सॅम कॉन्स्टन्सने बुमराहच्याही आणले नाकीनऊ

India vs Australia 4th Test: सध्या दोन्ही टीममधील ही सिरीज १-१ अशी बरोबरीत आहे. या चौथ्या टेस्टसाठी कांगारू टीमने एक दिवस आधी प्लेईंग-11 जाहीर केली होती.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून ५ सामन्याची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येतोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करतेय. सध्या दोन्ही टीममधील ही सिरीज १-१ अशी बरोबरीत आहे. या चौथ्या टेस्टसाठी कांगारू टीमने एक दिवस आधी प्लेईंग-11 जाहीर केली होती.

दरम्यान कर्णधार रोहित शर्माने टॉसनंतर प्लेइंग-11 बाबत माहिती दिली. यावेळी टीम इंडिया मेलबर्नमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी आला आहे. या मैदानावर त्याने शेवटच्या 2 टेस्ट टीमने जिंकल्या आहेत. भारतीय टीमने या मैदानावर एकूण 14 टेस्ट खेळल्या, त्यापैकी 4 जिंकल्या आणि 8 गमावल्या आहेत.

सुंदरला प्लेईंग ११ मध्ये संधी

मेलबर्न टेस्टमध्ये टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला. शुभमन गिलला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागी खेळण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला मैदानात उतरवण्यात आलं. मात्र, गिलला संघातून का वगळण्यात आले? याचे कारण समोर आलेलं नाही.

रोहित शर्माने सांगितले की, तो टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करणार आहे. मेलबर्नची खेळपट्टी स्पिरर्सना अनुकूल राहू शकते. कदाचित त्यामुळेच सुंदरला संधी देण्यात आली. दरम्यान टीम इंडियामध्ये गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग-११ मध्ये २ बदल

मेलबर्न टेस्टच्या एक दिवस आधी 25 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत त्याच्या प्लेइंग-11ची घोषणा केली होती. ट्रॅव्हिस हेडला भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आलं होतं. हेडसोबतच स्कॉट बोलँडचाही टीममध्ये समावेश करण्यात आलाय. ऑस्ट्रेलियन प्लेइंग-11 मध्ये दोन बदल करण्यात आले असून यामध्ये सॅम कॉन्स्टन्स डेब्यू करेल. त्याला नॅथन मॅकस्वीनीच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

19 वर्षीय खेळाडू बुमराहवर पडला भारी

19 वर्षीय सॅम कॉन्स्टन्स ऑस्ट्रेलियाकडून मेलबर्न टेस्टमध्ये डेब्यू केलं आहे. दरम्यान पहिल्याच टेस्ट सामन्यात त्याने छाप सोडली आहे. सॅम कॉन्स्टन्स या सामन्यात जणू हात धुवून जसप्रीत बुमराहच्या मागे लागला होता. बुमराहविरुद्ध रिव्हर्स स्वीप आणि स्वीपशिवाय त्याने विकेटसमोर उत्तम शॉट्स खेळले. बुमराहच्या एका ओव्हरमध्ये १४ तर अजून एका ओव्हरमध्ये १८ रन्स त्याने केले. या दोन ओव्हर्समध्ये त्याने २ फोर आणि २ सिक्स लगावलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT