shubman gill
shubman gill saam tv
क्रीडा | IPL

Shubman Gill Record: शुभमनच्या शतकी खेळीची इतिहासात नोंद; अशी कामगिरी करणारा ठरलाय पहिला अन् एकमेव फलंदाज

Ankush Dhavre

GT VS SRH IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६२ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण हा सामना जिंकणारा गुजरात टायटन्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

तर पराभूत झालेला सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला आहे. दरम्यान या सामन्यात तुफानी खेळी करत शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

शतकी खेळी करत रचला इतिहास..

शुभमन गिलने शतक झळकावताच त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो गुजरात टायटन्स संघाकडून शतक झळकावणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती.

मात्र एकही फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते. या खेळीसह त्याने गुजरात टायटन्स संघासाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रमही मोडून काढला आहे. यापूर्वी हा विक्रम शुभमन गिलच्याच नावे होता. त्याने ९६ धावांची खेळी केली होती. (Latest sports updates)

गुजरात टायटन्स संघासाठी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करणारे फलंदाज..

१०१ धावा - शुभमन गिल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

९६ धावा - शुभमन गिल विरुद्ध पंजाब किंग्ज

९४ धावा - डेव्हिड मिलर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

९४ धावा- शुभमन गिल विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

गुजरातचा जोरदार विजय..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनने ४७ धावांची खेळी केली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी बाद १८८ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर भुवनेश्वर कुमारने २७ धावांचे योगदान दिले. मात्र सनरायझर्स हैदराबादचा संघ विजयापासून ३४ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT