Arjun Tendulkar IPL 2023: LSG विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का! Arjun ला कुत्रा चावला, आज खेळणार का? -VIDEO

Dog Bites Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्स संघातील गोलंदाज अर्जुन तेंडुलकर सोबत मोठी घटना घडली आहे.
arjun tendulkar
arjun tendulkar twitter

LSG VS MI IPL 2023: लखनऊच्या एकाना स्टेडियमवर आज मोठा सामना रंगणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण हा सामना जिंकणाऱ्या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. तर पराभूत होणाऱ्या संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. दरम्यान या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघातील गोलंदाज अर्जुन तेंडुलकर सोबत मोठी घटना घडली आहे.

arjun tendulkar
Arjun Tendulkar IPL 2023: अर्जुनचं मुंबई संघात कमबॅक करणं कठीण! रोहित 'या' कारणामुळे ठेवतोय संघाबाहेर

लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघाविरुद्व होणाऱ्या सामन्यापूर्वी मुंबईचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावल्याची घटना घडली आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर जेव्हा संघातील खेळाडू सराव करत होते.

त्यावेळी अर्जुनने लखनऊ सुपर जायंट्स संघातील खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान त्याने कुत्रा चावला असल्याचा खुलासा केला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात अर्जुन तेंडुलकर लखनऊ सुपर जायंट्स संघातील खेळाडू युद्धवीर सिंग चरक आणि मोहसिन खानची भेट घेताना दिसून येत आहे. या भेटी दरम्यान तो सांगताना दिसून येत आहे की, त्याला कुत्रा चावला आहे. (Latest sports updates)

अर्जुनला कुत्रा चावला हे माहित पडताच युद्धवीर सिंग चरक आणि मोहसिन खानने काळजी करत त्याला विचारले की, कधी धावला कुत्रा? त्यावेळी अर्जुन सांगतो की एक दिवसापूर्वीच चावला आहे. हे ऐकताच दोघेही अर्जुनला काळजी घेण्यास सांगतात. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर, तुम्हाला दिसून येईल की , अर्जुनच्या डाव्या हाताला कुत्रा चावला आहे. त्यामुळे तो नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसून येत नाहीये.

आज अर्जुन खेळणार का?

आजचा सामना हा मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना गमावल्यास मुंबई इंडियन्स संघाला दुसऱ्या संघाच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. तसेच अर्जुन तेंडुलकरला गेल्या काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली गेली नाहीये. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही अर्जुन तेंडुलकर खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com