Shreyas Iyer google
Sports

BCCI Central Contract : वर्ल्डकप गाजवला, IPL मध्ये गरजला, चॅम्पियन्स ट्रॉफीत बरसला; आता मिळणार मोठं गिफ्ट

Shreyas Iyer will Received BCCI Central Contract: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच पुरुष क्रिकेटपटूंसाठी सेंन्ट्रल कॉन्ट्रक्टची यादी जाहीर करू शकते. या यादीत श्रेयस अय्यरचा समावेश केला जाऊ शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला फेब्रुवारी २०२४ मध्ये बीसीसीआयच्या सेन्ट्रल कॉन्ट्रक्टमधून वगळण्यात आलं होतं. श्रेयस अय्यरसाठी निश्चितच हा वाईट काळ होता. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करुनही, श्रेयर अय्यरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेंन्ट्रल कॉन्ट्रक्ट मधून काढून टाकण्यात आलं होतं. मात्र, या वर्षी मार्च अखेरीस होणाऱ्या बैठकीत श्रेयस अय्यरचा सेंन्ट्रल कॉन्ट्रक्ट मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो.

अलीकडेच, बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसाठी सेन्ट्रल कॉन्ट्रक्ट यादी (BCCI Contract List Women) जाहीर केली. पुरुष संघाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. वृत्तानुसार, २९ मार्च रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या उच्चस्तरीय बैठकीत सेंन्ट्रल कॉन्ट्रक्टवरही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. अय्यरसह, ईशान किशनच्या नावाचीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यरचा सेंन्ट्रल कॉन्ट्रक्टच्या यादीत समावेश

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, अय्यरचा बीसीसीआयच्या सेंन्ट्रल कॉन्ट्रक्ट यादीत पुन्हा समावेश होण्याची शक्यता आहे. २९ मार्च रोजी बीसीसीआयची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत सेन्ट्रल कॉन्ट्रक्टवर चर्चा केली जाईल. वृत्तानुसार, ईशान किशनला सेंन्ट्रल कॉन्ट्रक्टमध्ये स्थान द्यावे की नाही यावरही चर्चा केली जाईल.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अय्यरने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने ५ सामन्यांमध्ये ६५.७५ च्या सरासरीने आणि १०६ च्या स्ट्राईक रेटने २४३ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकाचांही समावेश होता.तो स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग न घेतल्यामुळे, बीसीसीआयने अय्यर आणि ईशान यांना २०२३-२४ च्या सेंन्ट्रल कॉन्ट्रक्टमधून वगळले होते. सेंन्ट्रल कॉन्ट्रक्टच्या यादीत नाव मिळवण्यासाठी खेळाडूला एका कॅलेंडर वर्षात तीन कसोटी, आठ एकदिवसीय किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतात.

गौतम गंभीरसोबत चर्चा होणार

वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया हे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची गुवाहाटीमध्ये भेट घेतील. जिथे सेंन्ट्रल कॉन्ट्रक्टबद्दल चर्चा होईल. गंभीर सध्या फ्रान्समध्ये त्याच्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहे. ३० मार्च रोजी गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होईल. ही चर्चा सामन्याच्या एक दिवस आधी होईल. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, "श्रेयस अय्यरला सेंन्ट्रल कॉन्ट्रक्टमध्ये स्थान मिळेल आणि त्याला अव्वल श्रेणीत स्थान दिले जाईल. तर, ईशानच्या नावाबाबत अजूनही चर्चा सुरू आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT