shreyas iyer catch video twitter
क्रीडा

IND vs ENG 2nd Test: श्रेयस अय्यरने घेतला 'कपिल देव' स्टाईल कॅच! Video पाहून कौतुकच कराल

Ankush Dhavre

Shreyas Iyer Kapil Dev Style Catch Video:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनममध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३९६ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडनेही चांगली सुरुवात केली, मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सुरुवातीलाच २ मोठे धक्के दिले आहेत.

भारताचा मध्यक्रमातील मुख्य फलंदाज श्रेयस अय्यरला सुर गवसलेला दिसत नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने ३५ तर दुसऱ्या डावात अवघ्या १३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याला अवघ्या २७ धावा करता आल्या आहेत.

फलंदाजीत फ्लॉप ठरत असला तरीदेखील क्षेत्ररक्षणात त्याने मोलाचं योगदान दिलं आहे. त्याने क्षेत्ररक्षण करत असताना भन्नाट झेल टिपला आहे.ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अय्यरने टिपला कपिल देव स्टाईल झेल..

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना २३ वे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल गोलंदाजीला आला होता. त्यावेळी इंग्लंडचा फलंदाज झॅक क्रॉली फेव्हिकॉलसारखा चिपकून होता.

क्रॉली ७६ धावांवर फलंदाजी करत असताना २३ वे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झॅक क्रॉलीने स्टेपआऊट करुन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र चेंडू बॅटचा कडा घेत हवेत गेला. त्यावेळी श्रेयस अय्यरने मागच्या दिशेने धावत डाईव्ह मारत झेल टीपला. त्याचा हा झेल पाहून कपिल देव यांनी १९८३ वर्ल्डकप स्पर्धत टीपलेल्या झेलची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Cricket news in marathi)

भारतीय संघाने केल्या ३९६ धावा..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने २०९ धावांची खेळी केली. जयस्वालला वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. तर गिलने ३४, श्रेयस अय्यर २७, रजत पाटीदार ३२,अक्षर पटेल २७, केएस भरत १७, आर अश्विनने २० धावा केल्या. दरम्यान भारतीय संघाचा संपूर्ण डाव ३९६ धावांवर आटोपला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT