IND vs AUS Saam tv
Sports

IND VS AUS: अंतिम कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल,'या' ३ खेळाडूंना रोहित ठेवणार संघाबाहेर

भारतीय संघाला जर ही मालिका जिंकायची असेल तर अंतिम सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS 4th test: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. सध्या या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.

मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यामुळे भारतीय संघाला जर ही मालिका जिंकायची असेल तर अंतिम सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा या सामन्यात मजबूत प्लेइंग ११ सह उतरणार आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अंतिम कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.

तर मोहम्मद सिराजला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे मोहम्मद सिराजला विश्रांती देऊन मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते.

तसेच रिषभ पंत येणारे काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी केएस भरतला संधी दिली जात होती.

मात्र त्याला या संधीचा लाभ घेता आला नाहीये. तो या मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये हवी तशी कामगिरी करू शकला नाहीये. त्यामुळे त्याच्याऐवजी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते.

मध्यक्रमात श्रेयस अय्यरला देखील सूर गवसला नाहीये. दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात एकही मोठी खेळी करता आली नाहीये. त्यामुळे त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते.

अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, ईशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Expressway Accident : मुंबई एक्सप्रेसवेवर भयानक अपघात, भल्या पहाटे पिकअपचा कोळसा, ३ जण जिवंत जळाले

ZP School Jobs: तयारीला लागा! जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांची भरती; निवडणुका संपताच नोटिफिकेशन निघणार

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

Success Story: वडिलांना UPSCत अपयश, लेकीने केले अपूरं स्वप्न पूर्ण; मेडिकलचे शिक्षण सोडून झाल्या IAS अधिकारी

SCROLL FOR NEXT