shreyas iyer twitter
Sports

Shreyas Iyer Viral Video: मोठ्या मनाचा श्रेयस! अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला; कारमध्ये बसला अन्...-VIDEO

Shreyas Iyer News In Marathi: भारतीय संघातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर मैदानावर आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यासह अनेकदा त्याने शानदार क्षेत्ररक्षणही केलं आहे. नुकताच भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार पार पडला.

या मालिकेतही त्याने शानदार क्षेत्ररक्षण केलं होतं. मात्र यावेळी तो मैदानातील कामगिरीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

श्रेयस अय्यर हा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतो. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात तो एका महिलेला मदत करताना दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलूनमधून हेअर कट करुन आल्यानंतर काही फॅन्स आणि पापाराझी त्याला घेरतात. त्यानंतर श्रेयस आपल्या कारमध्ये जाऊन बसतो. नेमकं तेव्हाच एक महिला तिकडे येते.

श्रेयस अय्यर कारमध्ये बसणार, इतक्यात ती महिला त्याला हाक मारते आणि मदत करण्यासाठी सांगते. ती पुन्हा पुन्हा मदत करण्याची मागणी करते. त्यावेळी श्रेयस अय्यर तिला थांबायला सांगतो आणि तंबाखू थुंकायला सांगतो. मदत मागत असलेल्या महिलेने तंबाखूचे सेवन केले होते. शेवटी तो तिची मदत करतो आणि हात मिळवून निघून जातो.

गेले काही महिने संघाबाहेर राहिलेल्या श्रेयस अय्यरला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत कमबॅक करण्याची संधी मिळाली. या मालिकेत त्याला फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आली नाही. मात्र क्षेत्ररक्षणात त्याने शानदार कामगिरी करुन दाखवली.

श्रेयस अय्यरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ८११ धावा केल्या आहेत. तर ६२ वनडे सामन्यांमध्ये २४२१ आणि ५१ टी-२० सामन्यांमध्ये ११०४ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT