shreyas iyer twitter
क्रीडा

Shreyas Iyer Comeback: अय्यर इज बॅक! वनडे वर्ल्डकपनंतर मुंबईकर अय्यर टीम इंडियात परतला

IND vs SL 1st ODI,Shreyas Iyer Comeback: श्रेयस अय्यरची सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून सुट्टी झाल्यानंतर तो पहिल्यांदाच भारतीय संघासाठी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Ankush Dhavre

आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं ही अभिमानाची बाब आहे. राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडू दिवसरात्र एक करतात. मात्र त्याहूनही कठीण काम म्हणजे संघात आपलं स्थान टिकवून ठेवणं. कारण एकदा संघाबाहेर पडल्यानंतर ती जागा भरून काढण्यासाठी हजारो खेळाडू रांग लावून उभे असतात. मात्र काही खेळाडू जिद्दीने पुन्हा उभे राहतात, मेहनत घेतात आणि संघात आपलं स्थान मिळवतात. असंच काहीसं घडलंय, भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरसोबत.

श्रेयस अय्यर हा भारताच्या मधल्या फळीतील एक मजबूत फलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला गरज होती. तेव्हा तेव्हा त्याने, महत्वपूर्ण खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यात जितका मोलाचा वाटा विराट, रोहित आणि शमीचा आहे तितकाच मोलाचा वाटा अय्यरचाही आहे.

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत त्याने ११ सामन्यांमध्ये ५३० धावा चोपल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतकं झळकावली होती. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर फेकला गेला.

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून सुट्टी

भारतीय संघातून बाहेर असलेल्या खेळाडूंना बीसीसीआयने रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला होता. ज्यात श्रेयस अय्यर आणि इशान किशनसारख्या खेळाडूंचा समावेश होता. दोघेही रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी आपल्या संघासोबत जोडले गेले नव्हते. त्यामुळे बीसीसीआयने दोघांनाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

केकेआरला बनवलं चॅम्पियन

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर आयपीएल स्पर्धेतही अय्यरचा बोलबाला पाहायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्स संंघाकडून खेळताना त्याने फलंदाजीतही दमदार कामगिरी केली. यासह कोलकाता नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT