Shreyanka patil  Twitter
Sports

WPL 2023: WPL मध्ये मराठमोळ्या श्रेयांकाचा खणखणीत षटकार; उपस्थितांना आठवला एबी डिव्हिलियर्स

Female AB de Villiers: विजय गुजरातने मिळावला मात्र चर्चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजाची झाली.

Ankush Dhavre

Shreyanka Patil Six: विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात विजय गुजरातने मिळावला मात्र चर्चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजाची झाली.

श्रेयांका पाटीलने मारलेल्या एका शॉटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

श्रेयांका पाटीलचा अप्रतिम शॉट.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयासाठी ३ चेंडूंमध्ये १८ धावांची गरज होती. जे कठीण काम होतं. मात्र तरीदेखील श्रेयांका पाटीलने पूर्ण जोर लावला. तिने षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाहेर निघून गुढघ्यावर बसून लेग साईडच्या दिशेने अप्रतिम षटकार मारला. हा लॅप शाॅट पाहून नेटकऱ्यांना एबी डिव्हिलियर्सची आठवण आली आहे.

पुढच्या चेंडुवरही तिने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला . मात्र तिचा हा प्रयत्न फसला, हा चेंडू निर्धाव राहिल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तिने ४ चेंडूंचा सामना करत ११ धावांची खेळी केली. यासह गोलंदाजी करताना तिने २ गडी देखील बाद केले होते.

हा गुजरात जायंट्स संघाचा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने सलग ३ सामने गमावले आहेत. सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघ अव्वल स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: कर्जत तालुक्यात आदिवासी भवन होणार

Sant Dnyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी भक्ताकडून चांदीची राखी अर्पण

Supari Pan Uses : सुपारीच्या पानांचे हे ७ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Maharashtra Politics : शिंदेसेनेच्या महिला शाखाप्रमुखाची तक्रार, ठाकरे गटातील आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT