Shocking news virat kohli fan who touched virat's feet during rcb vs pbks match beaten by security guards video viral amd2000 twitter
Sports

IPL Viral Video: विराटच्या पाया पडणाऱ्या फॅनला सुरक्षारक्षकांची अमानुष मारहाण, संतापजनक VIDEO व्हायरल

Virat Kohli Fan Beaten By Security Guards: या सामन्यादरम्यान एक फॅन सुरक्षारक्षकांना चकवा देत मैदानात घुसला होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Fan By Security Guard:

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शानदार खेळ केला आणि ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने विजयाचं खातं उघडलं. या सामन्यादरम्यान एक फॅन सुरक्षारक्षकांना चकवा देत मैदानात घुसला होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

क्रिकेट पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की, त्याने एकदा तरी आपल्या आवडत्या खेळाडूला भेटावं. काहींचं हे स्वप्न पूर्ण होतं. तर काही फॅन्स हे स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून वाटेल त्या थराला जातात. काही फॅन्स आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी थेट सुरक्षारक्षकांना चकवा देत मैदानात प्रवेश करतात.

असाच काहीसा प्रकार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान घडला होता. या सामन्यात फॅनने सुरक्षारक्षकांना चकवा दिला आणि धावत थेट विराट कोहलीला गाठलं. त्याने विराटला मिठी मारली आणि त्याच्या चरण देखील स्पर्श केले. इतक्यात सुरक्षारक्षक आले आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन गेलं.

यापुढे जे झालं, ते याहून भयानक होतं. मैदानाच्या बाहेर घेऊ गेल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला जबर मारहाण केली. नियमानुसार त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं. मात्र सुरक्षारक्षकांनी कायदा हातात घेतला.

हा सामना चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला. त्यामुळे हे सुरक्षारक्षक याच मैदानावरील असणार यात काही शंका नाही. व्हायरल होत असलेल्य व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरक्षारक्षक त्या फॅनला मैदानाबाहेर खेचत घेऊन जातात. त्यानंतर मैदानाबाहेर गेल्यानंतर कुठलाही विचार न करता ते सुरक्षारक्षक घुसखोरी करणाऱ्याला मारहाण करु लागतात.

त्याने चूक केली आहे, हे जगजाहीर आहे. मात्र त्याला पोलिसांकडे द्यायचं सोडून मारहाण करण्याचा हक्क कोणी दिला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्यांवर काय कारवाई होणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT