Shoaib Akhtar On Pakistan Cricket Team Defeat saam tv
Sports

Shoaib Akhtar : बिनडोक @@@#@! शोएब अख्तरने पाकिस्तानची लाज काढली, 'या' भारतीय खेळाडूचे तोंडभरून कौतुक

Shoaib Akhtar On Pakistan Cricket Team Defeat: विराटने शतक ठोकून टीम इंडियाला विजयाच्या वाटेवर नेलं. भारताकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पाकिस्तानी संघ भारतीय टीमसमोर टिकू शकला नाही.

Surabhi Jayashree Jagdish

रविवारी रात्री अनेक क्रिकेट प्रेमींचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानी टीमवर ६ विकेट्सने विजय मिळवला. भारतीय टीमकडून विराट कोहलीने शानदार कामगिरी केली. विराटने शतक ठोकून टीम इंडियाला विजयाच्या वाटेवर नेलं. भारताकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पाकिस्तानी संघ भारतीय टीमसमोर टिकू शकला नाही.

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांना फायदेशीर ठरला नाही. यावेळी संपूर्ण पाकिस्तानची टीम केवळ २४१ रन्स करू शकली. यानंतर भारताला या लक्ष्याचा पाठलाग करण्यात कोणतीही अडचण आली नाही. दरम्यान पाकिस्तानच्या या दारूण झालेल्या पराभवानंतर शोएब अख्तरने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला शोएब अख्तर?

पाकिस्तानी टीमच्या पराभवावर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, तुम्ही म्हणत असाल की मी निराश झालो आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मी अजिबात निराश झालो नाही. कारण मला माहितीये आहे पुढे काय होणार आहे. जेव्हा तुम्ही पाचवा गोलंदाज निवडू शकत नाही आणि जग ६-६ गोलंदाज खेळवत असतं. तुम्ही दोन ऑलराऊंडर खेळाडूंसोबत खेळा. मुळात टीममधील खेळाडूंना काहीच माहित नाहीये. फक्त खेळायला गेलेत, काय करावं हे कोणालाच कळत नाही.

कोहलीचं केलं कौतुक

शोएब अख्तर म्हणाला पुढे म्हणाला की, जर कोणी विराट कोहलीला सांगितलं की, त्याला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे, तर तो पूर्णपणे तयार होऊन येईल आणि १०० रन्स करून निघून जाईल. तो आधुनिक क्रिकेटचा सुपरस्टार फलंदाज आहे. वनडे सामन्यांमध्ये पाठलाग करणारा मास्टर आहे. यात काही शंका नाहीये. तो प्रामाणिक आहे आणि त्याने १४००० रन्सही पूर्ण केलेत. मी त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

विराट कोहलीचं शतक

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी टीमने फक्त २४१ रन्स केले. टीमकडून फक्त सौद शकीलला अर्धशतक झळकावता आलं. उर्वरित फलंदाज वाईटरित्या अपयशी ठरले आणि त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानी टीम मोठी खेळी करू शकला नाही. विराट कोहली भारतीय टीमसाठी विजयाचा खरा हिरो ठरला. त्याने नाबाद १०० धावा केल्या. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरनेही ५६ धावांची खेळी खेळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT