Shlok Ghorpade, dirt track racing , satara saam tv
Sports

Pune Festival Dirt Track Meet : डर्ट ट्रॅक स्पर्धेत साता-याचा श्लोक घोरपडे चमकला

लहान वयात श्लाेकनं मिळविलेल्या यशाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

Siddharth Latkar

Satara News : पुणे येथील आर्म्स पुणे फेस्टिव्हल डर्ट ट्रॅक इव्हेंट 2022 या स्पर्धेमध्ये सातारा येथील के. एस .डी. शानभाग विद्यालयातील श्लोक विक्रम घोरपडे (Shlok Ghorpade) याने विजेतेपद मिळवले आहे. पंधरा वर्षाखालील गटात झालेल्या या डर्ट ट्रॅक स्पर्धेत श्लोक विक्रम घोरपडे याने त्याच्या केटीएम 150cc बाईक अतिशय सफाईदारपणे चालवत या डर्ट ट्रॅक स्पर्धेतील आव्हानांना तोंड देत हे विजेतेपद मिळवले आहे. (satara latest sports news)

पुणे (pune) येथील गोळीबार मैदान कॅम्प परिसरात झालेल्या या स्पर्धेमध्ये श्लोकने अतिशय अव्वल कामगिरी लहान वयात करून दाखवून उपस्थितांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने नुकत्याच एमआरएफ मोग्रीप सुपर क्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेतही सोळा वर्षाखालील गटात उत्कृष्ट कामगिरी केली हाेती. तसेच एमआरएफ मोग्रीप नॅशनल फॉरेन ओपन कॅटेगरी स्पर्धेतही सुरेख सादरीकरण केले हाेते.

श्लोक घोरपडेने आर्म्स पुणे फेस्टिव्हलच्या या स्पर्धेत ओपन कॅटेगरीमध्ये फर्स्ट मोटो फर्स्ट इयर सेकंड मोटोमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला. नॅशनल चॅम्पियनशिप 2022 च्या एकूण सहा राउंडमध्ये त्याने त्यापैकी तीन अतिशय व्यवस्थितपणे पार करत नाशिक, पुणे आणि कोइंबतूर येथेही या स्पर्धांना सहभाग नोंदवत यश मिळवले आहे. तसेच या सर्वच ठिकाणी संपन्न झालेल्या स्पर्धेत आपल्या बाईक रायडिंग, ड्रायव्हिंगचे कसब पणाला लावत या स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्याचे ज्येष्ठ क्रीडा (sports) संघटक रमेश शानभाग यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT