Rally of Himalayas : तनिका शानभागची चमकदार कामगिरी

Tanika Shanbhag
Tanika Shanbhag
Published On

सातारा : जगातील सर्वात आव्हानात्मक मोटरस्पोर्ट्स इव्हेंट्सपैकी एक "हिमालयातील रॅली" Rally of Himalayas यामध्ये साता-यातील तनिका संकेत शानभाग हिने नववे स्थान पटकाविले आहे. या रॅलीचे हिमालयन एक्स-ट्रिम मोटरस्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आयाेजन करण्यात आले हाेते. tanika-shanbhag-succeeds-in-rally-of-himalayas-adventure-sports-satara-trending-news-sml80

Tanika Shanbhag
नाद खूळा! कस्तुरी सावेकरने माऊंट मनस्लूवर फडकवला तिरंगा

हिमालयन एक्स-ट्रिम मोटरस्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सुरेश राणा म्हणाले गेल्या वर्षापासून रॅली हाेत नसल्याने मोटारस्पोर्ट प्रेमी निराश झाले हाेते. अखेर त्यावर आम्ही अनेक महिने काम केले आणि सरकारच्या पाठिंब्यासह देशाच्या सर्वोच्च रॅली संघांशी बाेलून त्यांना हिमालयीन भूभागांवर पाऊल टाकण्यास तयार रहा असे सांगितले हाेते. या रॅलीमध्ये विक्रमी ७० बाईकर्सने सहभाग नाेंदविला होता. इतक्या मोठ्या संख्येने सहभागींची नोंद यापूर्वी कधीही झाली नव्हती.

या रॅलीत साता-याच्या तनिकाने उज्जवल यश मिळविले आहे. तिने समाजमाध्यमातून सातारकरांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणते मी माझ्या गटात प्रथम क्रमांक मिळविल्याचा मला आनंद झाला आहे. रॅली ऑफ हिमालयाच्या Rally of Himalayas पहिल्या आवृत्तीत एकूण ७५ सहभागींपैकी नववे स्थान मिळविल्याने परमानंद झाला आहे. संताेश विषणाेई, जतीन जैन, श्री. विक्रम यांच्या सहकार्यामुळे या रॅलीत यश मिळवू शकले. याबराेबरच सुरेश राणा यांच्यासह वडील संकेत आणि आजाेबा रमेश शानभाग यांच्याशिवाय रॅली जगातील सर्वात रोमांचकारी आणि साहसी रॅलीत यश मिळविणे शक्यच नव्हते अशी भावना तनिकाने Tanika Shanbhag व्यक्त केली. दरम्यान आगामी काळात ही रॅली आंतरराष्ट्रीय बाईकस्वारांना आकर्षित करेल असा विश्वास तनिकाने व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com