शिखर धवन. डावखुरा फलंदाज. संयमी स्वभाव, त्याहून कैक पटीनं आक्रमक फलंदाजी. टीम इंडियाचा एकेकाळचा हुकमी एक्का. सलामीला येऊन प्रतिस्पर्धी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करून संघाला चांगली सुरुवात करून देणारा सलामीवीर. एकदा मैदानात टिच्चून उभा राहिला की गोलंदाजांची चौफेर धुलाई करणार हे कन्फर्म. याच धवनचा एकेकाळी ऑरा होता. पण फॉर्मात असतानाही तो हळूहळू झाकोळला गेला आणि मैदानावर दिसेनासा झाला. ते का आणि कसं झालं, हे स्वतः शिखर धवननं उघड केलंय. टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमुळं करिअर संपलं, असा दावा शिखर धवननं केला.
शिखर धवनचं करिअर का संपलं आणि कुणामुळं संपलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचं उत्तर स्वतः शिखर धवननं दिलंय. इशान किशन आणि शुभमन गिल यांच्या शानदार कामगिरीतील सातत्यामुळं माझं करिअर संपलं, असा दावा धवननं केला आहे. भारतीय संघातून मला बाहेर पडावं लागेल हे त्या दोघांची कामगिरी बघूनच आला होता, अशी कबुलीही त्यानं दिलीय.
शिखर धवन यानं यावेळी शुभमन गिलबाबत बरंच काही सांगितलं. शुभमन गिल चांगली कामगिरी करत होता. त्याच्या कामगिरीतील सातत्यामुळं वनडे वर्ल्डकपच्या आधी भारताच्या वनडे संघातून बाहेर जावं लागलं. गिल हा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये उत्तम कामगिरी करत होता. वनडे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये तो चांगला खेळला होता. त्यामुळं स्पर्धेत टिकणं माझ्यासाठी कठीण झालं होतं, असंही शिखर धवन म्हणाला.
शुभमन गिल हा टी २० आणि कसोटीमध्ये जबरदस्त कामगिरी करत होता. मी त्यावेळी केवळ वनडे संघातून खेळत होतो. पण गिल हा प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगला खेळत होता. तो स्वतःचाच एक ऑरा तयार करत होता. त्यावेळीच मला स्वतःला जाणवलं की मी आता खूप वर्षे आंतरराष्ट्रीत संघातून खेळू शकणार नाही, असंही धवन म्हणाला.
संघातून वगळल्यानंतर मनात नेमकी काय भावना होती, याबाबत भारताचा माजी सलामीवीर शिखर धवननं प्रतिक्रिया दिली. २०२१ टी २० वर्ल्डकप संघात माझं नाव नसेल हे मला ठाऊक होतं. मला त्याची जाणीवही होती. ज्यावेळी संघात नाव नव्हतं, तेव्हा मी कुणालाही याबाबत विचारणा केली नाही. मी विचारलं असतं तरी त्यांनी स्पष्टीकरण दिलं असतं. त्याला काहीही अर्थ नव्हता आणि त्यामुळे काहीही बदल होऊ शकला नसता, असंही धवननं सांगितलं.
इशान किशनने ज्यावेळी द्विशतक झळकावलं त्यावेळी माझं करिअर आता संपलं, असं वाटू लागलं होतं. धवननं 'द वन' या त्याच्या आत्मचरित्राची घोषणा केली आहे. त्याआधी त्यानं हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. त्यात त्याने करिअरबाबत बरंच काही सांगितलं. मी बऱ्याच फिफ्टी केल्या होत्या. पण मी १०० धावा करू शकलो नाही. खूप वेळा ७० च्या आसपासही धावा केल्या. पण जेव्हा इशान किशनने २०० धावा केल्या, त्यावेळी माझ्या अंतरात्म्यानं सांगितलं की हे तुझं करिअर संपवू शकतो आणि तेच झालं. मला आठवतं की माझे काही मित्र मला सहानुभूती दाखवण्यासाठी आले होते. मी निराश झालो असेल असं त्यांना वाटलं होतं. पण मी खूप शांत होतो. जे घडत होतं त्याचा आनंद घेत होतो, असं शिखर धवनने निखळपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.