Shikhar Dhawan engagement Sophie Shine saam tv
Sports

Shikhar Dhawan Engagement: शिखर धवनने गर्लफ्रेंड सोफीसोबत केला साखरपुडा; घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर गब्बर अडकणार लग्नाच्या बेडीत

Shikhar Dhawan engagement Sophie Shine: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन याने आपल्या गर्लफ्रेंड सोफी शाईन सोबत साखरपुडा केला आहे. घटस्फोटानंतर तीन वर्षांनी धवनने पुन्हा आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शिखरने त्याची गर्लफ्रेंड सोफी शाईनसोबत साखरपुडा केला आहे. याची अधिकृत घोषणा त्याने इंस्टावर फोटो पोस्ट करत दिलीये. २०२५ मध्ये दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती दिली होती. यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत होते.

धवनची गर्लफ्रेंड सोफी आयरलँडमध्ये राहणारी आहे. सोफी तिच्या सोशल मिडियावर फार एक्टिव्ह असते. यावेळी इन्स्टावर ती तिचे फोटो पोस्ट करत असते.

शिखर धवनची खास पोस्ट

शिखर धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्याने म्हटलंय की, सुखापासून ते आमच्या स्वप्नापर्यंत आम्ही सगळं काही शेअर केलं आहे. साखरपुड्यासाठी आम्हाला तुमच्याकडून जे प्रेम, आशिर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या त्यासाठी आम्ही आभारी आहोत. आम्ही सदैव एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर आणि सोफी...

फेब्रुवारीमध्ये दोघं अडकणार लग्नबंधनात?

सोफीचा मार्केटींग आणि मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. तिने लिमरिक इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि कॅसलट्रॉय कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. सध्या ती अबू धाबीमधील एका कॉर्पोरेशनमध्ये प्रोडक्ट कंसल्टेंट म्हणून काम पाहते. काही रिपोर्ट्सनुसार, असं समोर आलंय की, दोघंही दिल्लीत फेब्रुवारीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

२०२३ मध्ये आएशा मुखर्जीसोबत झाला घटस्फोट

शिखर धवन दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये आएशा मुखर्जीसोबत त्याने पहिलं लग्न केलं होतं. याल दोघांना एक मुलगा देखील आहेत. मात्र काही वैयक्तिक कारणांनी या दोघांनी २०२३ मध्ये घटस्फोट घेतला.

तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळलाय धवन

शिखर धवन टीम इंडियासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळला आहे. यावेळी २०२४ मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने आतापर्यंत ३४ टेस्ट सामन्यांमध्ये २,३१५ रन्स केले. १६७ वनडे सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ६,७९३ रन्सची नोंद आहे. त्याने ६८ टी-२० सामन्यांमध्ये १,७५९ रन्स केलेत. ज्यामध्ये एकूण ११ अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

SCROLL FOR NEXT