shikhar dhawan yandex
Sports

Shikhar Dhawan: मुलाच्या आठवणीने शिखर धवन भावुक; मनातील इच्छा व्यक्त करत म्हणाला...

Shikhar Dhawan On Son Zoravar: काही दिवसांपूर्वी शिखर धवनने जोरावरच्या वाढदिवशी भावुक करणारी पोस्ट शेअर केली होती. आता शिखर धवन पुन्हा एकदा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Shikhar Dhawan On Zoravar:

भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनने आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सराव करायला सुरुवात केली आहे. दरम्यान यावेळी तो आपल्या फलंदाजीमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

शिखर धवन आणि त्याचा मुलगा जोरावर हे दोघे एकत्र राहत नाहीत. शिखर धवन आणि आयशा यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर जोरावर हा आपल्या आईकडे म्हणजे आयशाकडेच राहतो. काही दिवसांपूर्वी शिखर धवनने जोरावरच्या वाढदिवशी भावुक करणारी पोस्ट शेअर केली होती. आता शिखर धवन पुन्हा एकदा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

'ह्युमन्स ऑफ बॉम्बे पॉडकास्ट'ला दिलेल्या मुलाखतीत शिखर धवन म्हणाला की,'माझी अशी इच्छा आहे की, मी माझ्या मुलाला मिठी मारावी. मी त्याला रोज मेसेज लिहून पाठवतो, तो मेसेज त्याला लिहून मिळतो की नाही हे मला माहित नाही. मी त्याचा वडील आहे. मी माझं कर्तव्य बजावत आहे. मला त्याची खूप आठवण येत आहे. मला वाईट वाटतं पण मी या गोष्टी सोबत घेऊन जगायला शिकलो आहे.'

फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा..

काही दिवसांपूर्वी जोरावरचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवशी शिखर धवनने त्याचा फोटो शेअर करत भावूक करणारी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर त्याने कॅप्शन म्हणून,'तुला पाहून १ वर्ष झाला आहे. ३ महिने उलटून गेले आहेत,तू सर्व सोशल साईट्सवरुन मला ब्लॉक केलं आहेस. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोटो पोस्ट करतोय.' (Cricket news in marathi)

गेली अनेक वर्षे भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. मात्र फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं आहे. डिसेंबर २०२२ मध्ये तो बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळू शकलेलं नाही.

असा राहिलाय रेकॉर्ड..

शिखर धवनच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३४ कसोटी सामन्यांतील ५८ डावात २३१५ धावा केल्या आहेत. तर १६७ वनडे सामन्यातील १६४ डावात त्याने ६७९३ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६८ सामन्यातील ६६ डावात त्याने १७५९ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT