Sheryas iyer revealed the reason behind defeat agaist csk in csk vs kkr match amd2000 twitter
Sports

Shreyas Iyer Statement: नेमकं चुकलं तरी कुठं? सामन्यानंतर श्रेयस अय्यरने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

CSK vs KKR, IPL 2024: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेला बुलेट ट्रेनसारखीच सुरुवात केली. मात्र CSK विरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

CSK vs KKR, Shreyas Iyer Statement:

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेला बुलेट ट्रेनसारखीच सुरुवात केली. मात्र चेन्नईला या बुलेट ट्रेनला ब्रेक लावला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून धुव्वा उडवत चेन्नई सुपर किंग्ज संघाने शानदार विजय मिळवला. सलग ३ सामने जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्लान नेमका कुठे फसला? या सामन्यात नेमक्या काय चुका झाल्या? याबाबत श्रेयस अय्यरने भाष्य केलं आहे.

हा सामना झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ' आम्हाला पावरप्लेमध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्यानंतर आम्ही विकेट्स गमावल्या. इथे धावा करणं सोपं नव्हतं. पावरप्ले झाल्यानंतर आम्हाला परिस्थितीनुसार फलंदाजी करता आली नाही.चेन्नईच्या गोलंदाजांची फुल प्लानिंगने गोलंदाजी केली.' (Cricket news in marathi)

तसेच तो पुढे म्हणाला की, ' आम्ही डाव सावरण्याच्या प्रयत्न केला. मात्र आम्हाला प्लानिंगनुसार खेळ करता आला नाही. पावरप्लेनंतर खेळपट्टीने आपलं खरं रूप दाखवलं. आम्हाला वाटलं होतं की, आम्ही १६०-१७० धावा करू आणि आमची त्याच दिशेने वाटचाल सुरू होती. एक चांगली गोष्ट आहे की, हे स्पर्धेेच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालं आहे. आम्हाला परिस्थितीचं आकलन करावं लागेल.'

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ९ गडी बाद १३७ धावा करता आल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्ज संघाने १७.४ षटकात पूर्ण केलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

SCROLL FOR NEXT