Sherfane Rutherford 5 Sixes in 5 Balls : टी-20 फॉर्मेटमध्ये गोलंदाजांपेक्षा फलंदाजांची जास्त दहशत असते. क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये नेहमी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी बघायला मिळते. अनेकदा सफाट मैदानावर चेंडू स्वींग होत नसल्याने बॅट्समन बॉलरवर तुटून पडतात. असाच काहीसा प्रकार दुबईतील टी-20 लीगमध्ये घडला आहे.
युएईमध्ये पहिल्यांदा खेळवल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय T20 लीग सामन्यात वेस्ट इंडिजचा खेळाडू शेरफेन रदरफोर्डने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी दुबई येथे झालेल्या सामन्यात रदरफोर्डने डेजर्ट वायपर्स संघाकडून खेळताना मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. (Latest Marathi News)
रदरफोर्डने दुबई कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला एकाच षटकांत सलग ५ षटकार ठोकले. रदरफोर्डने १६ व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूपासून अखेरच्या बॉलपर्यंत गगनभेदी सिक्सर मारले. (Cricket News)
युसूफ पठाणने टाकलेला पहिल्या बॉलवर एक धाव निघाली. त्यानंतर रदरफोर्ड हा स्ट्राईकवर आला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर पठानच्या डोक्यावरुन पहिला सिक्स मारला. त्यानंतर लाँग ऑनला पुढचा सिक्स मारला. रदरफोर्डने पुढच्या चेंडूवर पुल करुन लेग साइडला सिक्स मारला. (Sport News)
युसूफ पठाणने टाकलेल्या शेवटच्या बॉलवर देखील रदरफोर्डने स्वीप मारुन लेग साइडला सिक्स मारला. रदरफोर्ड ओव्हरचा पहिला चेंडू खेळला नव्हता. अन्यथा सहा बॉलमध्ये सहा सिक्सच्या रेकॉर्डची नोंद झाली असती.
दरम्यान, युसूफ पठानकडे ओव्हर सोपवणं दुबई कॅपिटल्सला चांगलंच महागांत पडलं. या ओव्हरमध्ये रदरफोर्डने तब्बल ३१ धावा वसूल केल्या. ५ षटकारांच्या मदतीने रदरफोर्ड २० चेंडूत ४६ धावांवर पोहोचला. त्यानंतर त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
याआधी टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज युवराज सिंहने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये सलग ६ षटकार लगावले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरन पोलार्ड यांनी एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.