Shane warne Saam tv
क्रीडा

Shane Warne death anniversary: जेव्हा फिरकीच्या जादुगारानं टाकला होता 'बॉल ऑफ द सेंच्युरी',पाहा तो ऐतिहासिक क्षण

आजच्याच दिवशी क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज गोलंदाजाने जगाचा निरोप घेतला होता

Ankush Dhavre

Shane warne ball of the century video: क्रिकेटप्रेमी ४ मार्च हा दिवस कधीच विसरू शकणार नाही. कारण आजच्याच दिवशी क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज गोलंदाजाने जगाचा निरोप घेतला होता. या गोलंदाजाने लेग स्पिन गोलंदाजीच्या बळावर जग जिंकलं.

आम्ही कोणाबद्दल बोलतोय याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. आम्ही बोलतोय फिरकीचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वॉर्न बद्दल.

आजच्याच दिवशी २०२२ त्याने थायलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. शेन वॉर्न आपल्या मित्रांसह सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी थायलंडला गेला होता. इथेच त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याने वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Latest sports updates)

जोपर्यंत क्रिकेट विश्वास शेन वॉर्न हे नाव जिवंत राहील तोपर्यंत त्याने टाकलेल्या एका बॉलचा उल्लेख होत राहील. हा बॉल म्हणजे शेन वॉर्नने टाकलेला 'बॉल ऑफ द सेंचुरी..'

ॲशेस मालिका ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी मानाची कसोटी मालिका आहे. या मालिकेत भारत- पाकिस्तान सामन्यासारखाच क्रेझ पाहायला मिळत असतो. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना २९८ धावा ठोकल्या होत्या.

त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून शेन वॉर्नची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड संघाचा डाव २१० धावांवर संपुष्ठात आला होता. (Shane warne death anniversary)

इंग्लंड संघ पहिल्या डावात फलंदाजीला येताच शेन वॉर्नने इंग्लंड संघाला पहिला धक्का दिला होता. ७१ धावसंख्येवर इंग्लडचा पहिला फलंदाज माघारी परतला. शेन वॉर्नने घेतलेल्या या विकेटची दखल वर्षानुवर्षे घेतली जाईल.

शेन वॉर्नने टाकलेला बॉल ऑफ द सेंच्युरी..

शेन वॉर्नचा चेंडू टप्पा पडून किती फिरायचा हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र यावेळी चेंडू अपेक्षेपेक्षा जरा जास्तच फिरला होता. तर झाले असे की , षटकातील पहिलाच चेंडू टाकण्यासाठी शेन वॉर्न सज्ज झाला. इंग्लंडचा माईक गेटिंग फलंदाजी करत होता.

त्यावेळी शेन वॉर्नने ओव्हर द विकेटचा मारा करत उजव्या हाताच्या फलंदाजाला लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला. फलंदाजाने हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा चेंडू इतका फिरला की, लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू ऑफ स्टंप उडवून गेला. हा चेंडू आजही बॉल ऑफ द सेंच्युरी म्हणून ओळखला जातो.

शेन वॉर्नच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ गडी बाद केले होते. तर वनडे कारकिर्दीत त्याने २९३ गडी बाद केले होते.

तर आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याने ५७ गडी बाद केले होते. यासह त्याने राजस्थान रॉयल्स संघाला पहिल्याच हंगामात जेतेपद देखील मिळवून दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT