Ind Vs Aus Indore test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. इंदूरच्या मैदानात झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला ९ गडी राखून मात दिली. हा सामना तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात आटोपला. इंदूरच्या मैदानातील खेळपट्टीवरून जोरदार टीका होत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी खेळपट्टीवरून नाराजी व्यक्त केली. असं असतानाच, आता आयसीसीनं खेळपट्टी आणि मैदानालाच ' कठोर शिक्षा' दिली आहे.
आयसीसीनं (ICC) इंदूरच्या खेळपट्टीला 'खराब' (Poor) रेटिंग दिली आहे. ही रेटिंग आयसीसी पिच अँड आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रोसेसच्या अंतर्गत देण्यात आली आहे. तसेच मॅच रेफरींच्या अहवालानंतर इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानाला तीन डिमेरिट पॉइंटही दिले आहेत. (Latest sports updates)
आयसीसीचे मॅच रेफरी क्रिस ब्रॉड यांनी सामन्याबद्दल अधिकारी आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांशीही चर्चा केली होती. सामनाधिकाऱ्यांना सतावणारी चिंताही ब्रॉड यांनी बोलून दाखवली. त्यानंतर एक अहवाल तयार करून आयसीसीला पाठवला. बीसीसीआयला (BCCI) देखील अहवाल पाठवला आहे. आता या कारवाईच्या विरोधात अपील करण्यासाठी १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
कर्णधार रोहित शर्माकडून खेळपट्टीचं समर्थन
भारत- ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होत आहे. सध्या या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांचे निकाल सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच लागला आहे. आता शेवटचा कसोटी सामना ९ मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे.
या कसोटी सामन्यांमध्ये खेळपट्टीवरून बरीच टीका झाली. पण भारतीय कर्णधार रोहित शर्माकडून (Rohit Sharma) खेळपट्टीचं समर्थन करण्यात आलं. सामन्यांचे निकाल लागत आहेत ही चांगली बाब आहे. खेळपट्टीची अजिबात चूक वाटत नाही. तर फलंदाजांनाच अशा खेळपट्ट्यांवर धावा करण्याचा मार्ग शोधावा लागेल, असे रोहित म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.