Narendra Modi & Jonty Rhodes
Narendra Modi & Jonty Rhodes Saam TV
क्रीडा | IPL

आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सचे मोदींच्या पत्राला 'लय भारी' उत्तर

वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सने (Jonty Rhodes) प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2022) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छांना उत्तर दिले आहे. त्यांने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि सांगितले की त्यांचे संपूर्ण कुटुंब संपूर्ण भारतासोबत प्रजासत्ताक दिन साजरा करते. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनी जॉन्टी रोड्सला पत्र पाठवले होते. यामध्ये त्यांनी रोड्सच्या भारताप्रती असलेल्या विशेष संबंधांचा उल्लेख केला आहे. त्याला मोदींनी भारताचा मित्र म्हणून देखील संबोधले होते. तसेच जॉन्टी रोड्सने आपल्या मुलीचे नावही इंडिया ठेवल्याचे नमूद केले आहे.

जॉन्टी रोड्सने पीएम मोदींच्या (Narendra Modi) पत्राला उत्तर देताना लिहिले, ''नरेंद्र मोदी जी तुमच्या प्रेमळ शब्दांबद्दल धन्यवाद. भारताच्या प्रत्येक दौऱ्यात मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो. माझे संपूर्ण कुटुंब संपूर्ण भारतासोबत प्रजासत्ताक दिन साजरा करते आणि भारतातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या संविधानाच्या आदर करते. जय हिंद''.

पंतप्रधान मोदींनी पाठवलेले पत्रही जॉन्टी रोड्सने आपल्या ट्विटमध्ये पोस्ट केले आहे. पत्रात लिहिले आहे, भारताकडून शुभेच्छा, दरवर्षी 26 जानेवारीला आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा तो दिवस आहे जेव्हा आमच्या संविधान सभेच्या प्रदीर्घ चर्चेनंतर भारतीय राज्यघटना लागू झाली. मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. या वर्षीचा प्रजासत्ताक दिन अतिशय महत्त्वाचा आहे कारण भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणूनच मी तुमच्या भारतावरील प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्हाला आणि भारतातील इतर मित्रांना पत्र लिहायचे ठरवले आहे. मला आशा आहे की तुम्ही आमचा देश आणि आमच्या लोकांसोबत एकत्र काम करत राहाल.

गेल्या काही वर्षांत तुम्ही भारत आणि इथल्या संस्कृतीशी एक विशेष बंध निर्माण केला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचे नाव या महान देशाच्या नावावर ठेवले तेव्हा हे विशेष कनेक्शन स्पष्टपणे दिसून येते. आमच्या देशाच्या मजबूत संबंधांचे तुम्ही विशेष दूत आहात. भारत सामाजिक-आर्थिक बदलांच्या ऐतिहासिक मालिकेचा साक्षीदार आहे. मला खात्री आहे की हे लोकांना सक्षम करेल आणि जागतिक स्तरावरही चांगले योगदान देईल. पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आगामी काळात तुमच्याशी बोलण्यास उत्सुक आहे असे नरेंद्र मोदी यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

SCROLL FOR NEXT