sarfarz khan hits ball on his head by mohammed wasim junior serious injury in pakistan super league video viral twitter
क्रीडा

Viral Cricket Video: कॅच घेतल्यानंतर फिल्डरनं बॉल जोरात फेकला, थेट सरफराजच्या डोक्यावर आदळला, पाहा VIDEO

Ankush Dhavre

Sarfaraz Ahmed Hits Ball On His Head:

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी दिली गेली आहे. त्याने पहिल्याच सामन्यात २ अर्धशतकं झळकावत दमदार सुरुवात केली. दरम्यान चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी सरफराज खान आणि रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

ज्यात रोहित शर्मा सरफराजला हेल्मेट घाल असं सांगताना दिसून येत आहे. दरम्यान हेल्मेट घातल्यामुळे सरफराज खान तर वाचला मात्र पाकिस्तान सरफराज हेल्मेट न घातल्यामुळे दुखापतग्रस्त झाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सरफराज अहमद दुखापतग्रस्त..

रांची कसोटीतील तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि सरफराज खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात सरफराज खान हेल्मेट न घालताच शॉर्ट पोझिशनला क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा राहिला. त्यावेळी रोहित शर्मा त्याला चेतावणी देताना दिसून आला. रोहित त्याला म्हणाला की,'ओय भाई.. इथे हिरो बनायचं नाही.' रोहितने सरफराजला वाचवलं, मात्र सरफराज अहमद दुखापतग्रस्त झाला आहे.

तर झाले असे की, पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात क्वेटा ग्लॅलिएटर्स आणि मुल्तान सुल्तान्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यातील शेवटचे षटक सुरु होते. त्यावेळी रिजा हेंड्रिक्स ७२ धावांवर फलंदाजी करत होता. हेंड्रिक्सने मोठा फटका मारला त्यावेळी मोहम्मद वसीम ज्यूनियरने बाऊंड्रीलाईनवर चांगला झेल टिपला. उत्साहाच्या भरात त्याने चेंडू हवेत फेकला. (Cricket news marathi)

मात्र हाच चेंडू सरफराज अहमदच्या डोक्यावर जाऊन लागला. हा चेंडू इतक्या जोरात लागला की, चेंडू लागताच तो मैदानावर झोपला. या दुखापतीमुळे त्याला मैदानही सोडावं लागलं. त्याला चेंडू लागल्याचं पाहून अंपायरही शॉक झाला. त्याच्यऐवजी सज्जाद यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानावर आला. सरफराज खानचा हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2024: सणा-सुदीच्या दिवसात झपाट्याने वजन वाढतंय? 'या' पद्धतीने करू शकता कंट्रोल

Kesar Panchmeva Kheer: देवी भरभरून आशीर्वाद देईल आणि प्रसन्न होईल; नैवेद्यात बनवा पंचमेवा खिर

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

IND-W vs NZ-W: हरमनप्रीतला राग अनावर; पराभवानंतर या खेळाडूंवर भडकली; सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Pune Crime: पुणे पुन्हा हादरले! ५ वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, कोंढव्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT