Sarfaraz Khan saam tv
Sports

IND vs WI: आधी वजन कमी कर अन् .., सरफराजला संघात स्थान न मिळण्याचं खरं कारण आलं समोर

Why Sarfaraz Khan Not Picked: सरफराज खानला भारतीय कसोटी संघात स्थान दिलं गेलं नाही.

Ankush Dhavre

Team India:भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India Tour Of West Indies) रवाना होणार आहे. या दौऱ्यावर २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात चेतेश्वर पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. तर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडला संघात स्थान दिलं गेलं आहे.

यात आणखी एक आश्चर्यकारक नाव म्हणजे युवा फलंदाज सरफराज खान. रणजी ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करूनही सरफराज खानला भारतीय कसोटी संघात स्थान दिलं गेलं नाही. भारतीय संघाची घोषणा होताच सुनील गावसकरांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते.

सरफराज खान रणजी ट्रॉफी स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करतोय. मात्र तरीदेखील त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळेल असे वाटत होते. मात्र यावेळी देखील त्याला दुर्लक्ष केलं गेलं आहे. एका सूत्राने असा दावा केला आहे की, खराब फिटनेस आणि वागणुकीमुळे सरफराज खानला संघात स्थान दिलं गेलं नाही. (Latest sports updates)

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय कसोटी संघ (Team India Test Squad For West Indies Tour) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT