Team India: पुजारा, विराटची सरासरी एकसारखी तर रहाणेची त्यापेक्षा वाईट; पुजाराला बाहेर करताच माजी खेळाडूने केली त्रिमूर्तीची पोलखोल

Aakash Chopra: माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने पुजाराला समर्थन केल्याचे पाहायला मिळाले आहे.
cheteshwar pujara and virat kohli
cheteshwar pujara and virat kohli saam tv
Published On

Cheteshwar Pujara: लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडूंवर जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. येत्या जुलै महिन्यात भारतीय संघातील खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी चेतेश्वर पुजाराला विश्रांती दिली गेली आहे.

पुजाराला संघाबाहेर केल्याची बातमी येताच माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने पुजाराला समर्थन केल्याचे पाहायला मिळाले आहे.

cheteshwar pujara and virat kohli
Team India: टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाची कारकिर्द संपली? Asia Cup पाठोपाठ World Cup स्पर्धेलाही मुकणार..

आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्राने म्हटले की,'पुजाराला या संघात दिलं गेलं नाही. आता प्रश्न असा पडतो की, हा निर्णय योग्य आहे का? मी कुठलंही वक्तव्य करत नाहीये, तर भारतीय संघातील काही क्रिकेटपटूंची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी सादर करतोय. कर्णधार रोहित शर्माने १८ सामन्यांमध्ये ४३ च्या सरासरीने सर्वाधिक धावा केल्या आहेत.'

कोहली आणि पुजाराची सरासरी एकसारखीच..

तसेच तो पुढे म्हणाला की, '१६ सामन्यांमध्ये गिलची सरासरी ही ३२ ची आहे. तर केएल राहुलची सरासरी ११ सामन्यांमध्ये ३० ची राहिली आहे. २८ सामन्यांमध्ये पुजाराची सरासरी २९.६९ ची आहे. तर विराट कोहलीची सरासरी देखील जवळपास आहे. उलट विराटला अधिकचे ३ सामने खेळायची संधी मिळाली आहे. या दोघांची सरासरी जवळ जवळ एकसारखीच आहे. २० सामने खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेची सरासरी तर यापेक्षा खराब आहे. त्याची सरासरी २६.५० ची राहिली आहे.' (Latest sports updates)

चेतेश्वर पुजाराबाबत बोलताना तो पुढे म्हणाला की, 'चेतेश्वर पुजाराची आकडेवारी पाहून संघाबाहेर केलं गेलं आहे. असं मुळीच म्हणू नका की, तो कमबॅक करू शकत नाही. अजिंक्य रहाणे देखील संघात कमबॅक केलं आहे. स्वतः चेतेश्वर पुजारा देखील संघाबाहेर झाला होता. त्यानंतर त्याने संघात कमबॅक केलं आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com