team india saam tv
Sports

Sarfaraz Khan Marriage: कश्मीर की कली पडली मुंबईकर क्रिकेटपटूच्या प्रेमात; गुपचूप उरकला विवाह सोहळा; पाहा PHOTOS

Sarfaraz Khan Married: मुंबईकर क्रिकेटपटू विवाह बंधनात अडकला आहे.

Ankush Dhavre

Sarfaraz Khan Love Story Wife Romana Zahoor: देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खानने आपल्या नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. सरफराज खान ६ ऑगस्ट रोजी काश्मीरमध्ये राहणाऱ्या रोमाना जहूरसोबत विवाह बंधनात अडकला आहे. सरफराज खानने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

या दोघांच्या विवाहानंतर आता दोघांच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. माध्यमातील वृ्त्तानुसार सरफराज खान आणि रोमाना जहूरची पहिली भेट दिल्लीत झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांचा एकमेकांवर जिव जडला होता. त्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. सरफराज खानच्या घरच्यांनी पुढाकार घेत थेट रोमानाच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घातली होती.

रोमानाने MLC चं शिक्षण पूर्ण केलं आहे. सरफराज खानची बहिण दिल्लीतील कॉलेजमध्ये शिक्षण घेते. याद कॉलेजमध्ये रोमाना जहूर देखील शिक्षण घेत होती. बहिणीच्या मदतीनेच या दोघांची भेट झाली होती. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. त्यानंतर दोघांनी मिळून बहिणीला सांगण्याचा निर्णय घेतला होता. सरफराज खानने आपल्या शाही विवाह सोहळ्यात काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर त्याच्या पत्नीने लाल आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. (Latest sports updates)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची पाहतोय वाट...

सरफराज खानने गेल्या २ वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. यादरम्यान त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. तरीदेखील तो भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. त्याला संघात स्थान दिलं जात नसल्याने निवडकर्त्यांवर जोरदार टीका केली गेली होती. आयपीएलच्या १६ व्या हंगामात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT