रणजी ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात मुंबईने २२४ धावा केल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा डाव अवघ्या १०५ धावांवर आटोपला. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मुंबईचा युवा फलंदाज मुशीर खानने शतकी खेळी केली. त्याने ३२६ चेंडूंचा सामना करत १३६ धावा केल्या. दरम्यान या खेळीनंतर मुशीर खानने मोठा खुलासा केला आहे.
या खेळीपूर्वी सरफराज खानने मुशीर खानला मोलाचा सल्ला दिला होता. याबाबत बोलताना मुशीर खान म्हणाला की,' माझ्या मोठ्या भावाने मला मी जसं खेळत आहे,तसंच खेळत राहण्याचा सल्ला दिला. माझं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याने मला संयम ठेवून खेळायला सांगितलं. तो मला म्हणाला की, मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कर.' (Cricket news in marathi)
इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी..
नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. तर दुसरीकडे धाकटा भाऊ मुशीर खानने आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत दमदार खेळ करुन दाखवला आहे. त्याने या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये ६० च्या सरासरीने ३६० धावा केल्या होत्या.
मुंबईची विजयाच्या दिशेने वाटचाल ...
मुंबईने या सामन्यातील दुसऱ्या डावात ४१८ धावा केल्या आहेत. यासह या सामन्यात ५३७ धावांची आघाडी घेतली. मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या डोंगराइतक्या आव्हानासह मुंबईने जवळजवळ आपला विजय निश्चित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.