Sanju Samson
Sanju Samson Saam TV
क्रीडा | IPL

Sanju Samson:शेवटी कंटाळलाच! BCCI च्या दुर्लक्षामुळे संजू सॅमसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकणार रामराम?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई, Saam TV News

Sanju Samson: सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने २-० ची आघाडी घेतली आहे.

तर उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी आणि त्यानंतर होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी तब्बल १० वर्षांनंतर जयदेव उनाडकटला संधी दिली गेली आहे. मात्र पुन्हा एकदा संजू सॅमसनला दुर्लक्ष केलं गेलं आहे. (Latest Sports Updates)

तर संजू सॅमसन होणार निवृत्त..

संजू सॅमसन हा सतत चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध करतोय. मात्र तरीदेखील बीसीसीआय त्याला संधी देत नाहीये. आयपीएल स्पर्धेत तसेच जेव्हा जेव्हा त्याला संधी दिली गेली आहे,तेव्हा त्याने धावा करत संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. असं असताना देखील त्याला संधी न मिळाल्याने तो वैतागून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो.

बीसीसीआय करतंय दुर्लक्ष..

माध्यमातील वृत्तानुसार वेस्टइंडिजविरुध्द झालेल्या मालिकेत संजू सॅमसन ऐवजी ईशान किशनला संधी दिली गेली होती. ज्यावेळी रिषभ पंतचा अपघात झाला त्यावेळी भारतीय संघात यष्टिरक्षण करण्यासाठी संजू सॅमसनला प्रबळ दावेदार मानले जात होते.

मात्र तो संघाबाहेर गेल्यानंतर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये ईशान किशन तर कसोटी क्रिकेटमध्ये केएस भरतला संधी दिली जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने संजू सॅमसनसमोर निवृत्ती घेण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्यारी सोडला नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : आमदार म्हणताहेत, "खासदार झाल्यासारखं वाटतंय', राज्यात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Special Report : ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा गड राखणं शिंदेंना जड? Politics

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

SCROLL FOR NEXT