Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

Uddhav Thackeray News Today | लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा तापतोय. तसे दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर तुटून पडत आहेत. आता भाजप नेते प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीय.

दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत. मुख्यमंत्री असूनही गैरव्यवहार केल्याने भाजप सरकारने त्यांच्यावर कारवाई केल्याचे बोलले जात आहे. याचे उदाहरण देत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा दिला आहे. पंढरपूरमध्ये आलेले लाड म्हणाले, कोरोना काळात मेलेल्या माणसाच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गैरव्यावहार केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल वाचले नाहीत, त्याप्रमाणे आता उद्धव ठाकरेही वाचणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी टीका केल्याने काही सवाल उपस्थित झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com