India vs South Africa 3rd T20I Today Match Playing 11 saam tv
Sports

Ind Vs Sa: तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनची होणार एन्ट्री; कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता? पाहा कशी असेल प्लेईंग ११

India vs South Africa 3rd T20I Today Match Playing 11: भारतीय संघाचा तिसरा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण संजू सॅमसन याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.र्वांचे लक्ष लागले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पाच सामन्यांची टी-20 सिरीज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. तिसरा सामना रविवारी धर्मशालामध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय टीमने पाहुण्यांना 101 रन्सने पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने जोरदार कमबॅक करत टीम इंडियाला 51 रन्सने हरवलं.

तिसऱ्या सामन्यात कोण मारणार बाजी?

आता तिसऱ्या टी-20 मध्ये दोन्ही टीम आघाडी मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियामध्ये कोणते बदल होणार का हे पाहावं लागणार आहे. आजच्या सामन्यात संजूला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रश्न असा आहे की संजूला टीममध्ये संधी दिल्यास कोणाला बाहेर बसवणार. अशावेळी जितेश शर्मा बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

गिलला बाहेर करण्याची शक्यता नाही

शुभमन गिलला बाहेर करण्याची शक्यता नाही, कारण तो संघाचा उपकर्णधार आहे. ओपनर म्हणून सतत अपयशी ठरूनही त्याला तिसऱ्या सामन्यात पुन्हा संधी दिली जाऊ शकते. याशिवाय भारतीय टीममध्ये इतर कोणतेही बदल होण्याची शक्यता नाही. तर दक्षिण आफ्रिका देखील त्याच संघासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

भारताची तिसऱ्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11

अभिषेक शर्मा

शुभमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती

दक्षिण आफ्रिकेची तिसऱ्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11

एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, डोनोवन फरेरा, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, जॉर्ज लिंडे, ओटनाइल बार्टमॅन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT