Indian Players Saam Tv
Sports

Team India : एकेकाळी मैदान मारलं, टीम इंडियाला तारलं; आता चॅम्पियन ट्रॉफीमधून डावललं, कोण आहेत ते महारथी?

Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठीच्या भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी यांनी कमबॅक केले आहे, तर काही खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे.

Yash Shirke

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा आज (१८ जानेवारी) बीसीसीआयने केली आहे. रोहित शर्माकडे कर्णधार तर शुबमन गिलकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी सारख्या खेळाडूंनी टीम इंडियामध्ये कमबॅक केले आहे. तर संजू सॅमसन, मोहम्मद सिराज सारख्या खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी न मिळालेल्या प्रतिभाशाली क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊयात..

१. संजू सॅमसन

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संजू सॅमसनच्या नावाची चर्चा होती. तरीही त्याला संघात संधी मिळाली नाही. विजय हजारे ट्रॉफी न खेळल्याने संजूला वगळण्यात आले अशी शक्यता काहींना वर्तवली आहे. तर रिषभ पंत आणि के. एल. राहुल संघात असल्याने संजू टीमच्या बाहेर आहे असे बरेचसे लोक म्हणत आहेत.

२. मोहम्मद सिराज

टीम इंडियातून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचाही पत्ता कट झाला आहे. मागील काही काळापासून सिराजचा खराब फॉर्म सुरु आहे. अशात बीसीसीआयने सिराजच्या जागी मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगवर विश्वास दाखवला आहे. सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेमधूनही त्याला वगळण्यात आले आहे.

३. युजवेंद्र चहल

फिरकीपटू युजवेंद्र चहललाही टीम इंडियात स्थान मिळाले नाही. चहल मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात होता. विश्वकपनंतर त्याला संघात संधी मिळाली नाही. त्याला इंग्लंडच्या विरुद्ध टी-२० मालिकेतही स्थान मिळाले नाही. चहल मोठ्या स्पर्धांपासून वगळण्यात येत आहे असे त्याचे चाहते म्हणत आहेत.

४. ईशान किशन

संजू सॅमसनप्रमाणे ईशा किशनला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी मिळाली नाही. वनडेमध्ये द्विशतकीय कामगिरी करणारा ईशान किशान २०२३ मध्ये वनडे टीममध्ये होता. त्यानंतर त्याला ड्रॉप करण्यात आले. बराच काळ देशांतर्गत क्रिकेटपासून लांब राहिल्यानंतर ईशानने पुन्हा कमबॅक केले.

५. शिवम दुबे

टी-२० विश्वचषकामध्ये शिवम दुबेचा समावेश करण्यात आला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शिवम दुबे चांगली कामगिरी करत आहे. असे असूनही त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा भारतीय संघ:-

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रविंद्र जडेजा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

SCROLL FOR NEXT