
येत्या फेब्रुवारी महिन्यात आयसीसी चॅम्पियन्य ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने आपल्या संघाची घोषणा केली आहे.
या मालिकेपूर्वी भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. दरम्यान संघाची घोषणा होताच भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सुरुवातीचे २ सामने खेळू शकणार नाहीये.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. या मालिकेतील चौथ्या सामन्यादरम्यान बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला पाचव्या कसोटीतील शेवटच्या दिवशी बाहेर बसावं लागलं होतं. तो अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे त्याला संघात तर स्थान दिलं गेलं आहे. मात्र त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
संघाची निवड झाल्यानंतर,रोहित शर्मा आणि अजित आगरकरने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना, रोहित शर्माने कन्फर्म केलंय की, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाहीये. यासह तो पुढील सामने खेळणार की नाही, हे देखील त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतही जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत मोहम्मद शमी कमबॅक करताना दिसून येणार आहे. तर सिराजला बसवून अर्शदीप सिंगला स्थान देण्यात आलं आहे. यासह हर्षित राणाचा बॅकअप गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.