AUS-W vs ENG-W: ॲशले गार्डनरचा अविश्वसनीय झेल, बाऊंड्री लाईनबाहेर चाललेला बॉल डाईव्ह मारत पकडला - video

Ashleigh Gardner Catch : ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज अॅशले गार्डनरने डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
AUS-W vs ENG-W: ॲशले गार्डनरचा अविश्वसनीय झेल, बाऊंड्री लाईनबाहेर चाललेला बॉल डाईव्ह मारत पकडला  - video
viral catch videoinstagram
Published On

ऑस्ट्रेलिया महिला आणि इंग्लंड महिला या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिा पार पडली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत इंग्लंडवर एकतर्फी विजयाची नोंद केली आहे.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनरने बाऊंड्री लाईनवर डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

AUS-W vs ENG-W: ॲशले गार्डनरचा अविश्वसनीय झेल, बाऊंड्री लाईनबाहेर चाललेला बॉल डाईव्ह मारत पकडला  - video
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी संघाला मोठा धक्का! प्रमुख गोलंदाजानंतर धाकड फलंदाज दुखापतग्रस्त

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३०९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. या डावात इंग्लंडकडून नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सोफी एक्लेस्टोन फलंदाजीला आली. त्यावेळी एक्लेस्टोनने मिडविकेटच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र अॅशले गार्डनर सीमारेषेवर तैनात होती. चेंडू सीमापार चालला होता. मात्र अॅशलेने मागच्या दिशेने उडी मारली आणि सीमापार जात असलेला चेंडू एकाच हाताने झेलला. तिचा तोल गेला होता. मात्र तिने चेंडू आत फेकला. त्यानंतर बाहेर जाऊन तिने पुन्हा आत येत शानदार झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

AUS-W vs ENG-W: ॲशले गार्डनरचा अविश्वसनीय झेल, बाऊंड्री लाईनबाहेर चाललेला बॉल डाईव्ह मारत पकडला  - video
Champions Trophy: Sanju Samson वर पुन्हा अन्याय? विकेटकिपिंगसाठी ही २ नावं चर्चेत

फलंदाजीत दाखवला जोर

क्षेत्ररक्षणाला येण्यापूर्वी तिने फलंदाजीत चांगलाच जोर लावला. तिने फलंदाजी करताना १०२ चेंडूंचा सामना करत १०२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने १ षटकार आणि ८ चौकार खेचले. तिच्या या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकअखेर ३०८ धावांपर्यंत मजल मारली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. इंग्लंडचा डाव ४२.२ षटकात आटोपला. इंग्लंकडून नेट सिव्हर ब्रंटने ६८ चेंडूंचा सांमना करत सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. इंग्लंडला २२२ धावा करता आल्या. यासह ऑस्ट्र्रेलियाने हा सामना ८६ धावांनी जिंकला. यासह वनडे मालिकाही जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com