Viral Video: अरे देवा! ऑफिसमध्ये गंमत पडली महागात; नोज रिंग खुर्चीत अडकून महिला अडचणीत, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video On Nose Ring Issue: नाकातील रिंगमुळे खुर्चीत अडकण्याची शक्यता महिलेच्या कल्पनेतही नव्हती. संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर हा विचित्र प्रसंग तुमच्यासाठीही आश्चर्याचा धक्का ठरू शकतो, ज्याने साऱ्यांना हसू आणि आश्चर्याचा अनुभव दिला आहे.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

इंडोनेशियातील एका कार्यालयात घडलेल्या अनोख्या घटनेने साऱ्यांचे लक्ष वेधले. एका महिला कर्मचाऱ्याने नाकात रिंग घातली होती, जी अचानक तिच्या ऑफिसच्या खुर्चीत अडकली. या अडचणीमुळे ती रिंग काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ती खुर्चीतून स्वत:ला सोडवू शकत नव्हती. या विचित्र प्रसंगामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. सहकाऱ्यांनी तिला मदत करून ती अडकलेली रिंग खुर्चीतून काढली आणि तिला मोकळे केले. या घटनेने ऑफिसमधील सर्वांना आश्चर्य आणि हास्याचा अनुभव दिला.

इंडोनेशियातील बडुंग येथे एका महिलेच्या नाकातील नवीन रिंगमुळे विचित्र घटना घडली. ती खुर्चीवर बसून गंमत करत असताना नाकातील रिंग खुर्चीत अडकली. सुरुवातीला हा प्रसंग मजेशीर वाटला, पण रिंग अडकून सुटत नसल्याने महिलेची अडचण वाढली. अखेर तिला मदतीसाठी बडुंग सिटी फायर डिपार्टमेंटमध्ये नेण्यात आले. स्थानिक माध्यमांनीही या घटनेची दखल घेतली. महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना सर्वांचीच तारांबळ उडाली. ही घटना कार्यालयात गोंधळाचे कारण ठरली आणि नंतर ती चर्चेचा विषय बनली.

Viral Video
Viral Video: ट्रेनमध्ये दोन महिला भिडल्या; झिंज्या उपटल्या , कपडे फाडले तरी थांबल्या नाहीत, पाहा व्हायरल VIDEO

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला वेदनेने ओरडताना दिसते, तर अग्निशमन दलाचे कर्मचारी तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रसंगादरम्यान अग्निशमन दलाचे लोकही हसू दडवू शकले नाहीत. अखेर त्यांच्या मदतीने महिलेला सोडवण्यात आले. ही घटना हास्याचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे.

महिलेची नाकातील रिंग खुर्चीत अडकल्यानंतर, अग्निशमन दलाने तिला सोडवण्यासाठी मोठ्या उपकरणांचा वापर केला. अवघ्या १० मिनिटांत त्यांनी तिची सुटका केली, पण या दरम्यानची घटना व्हिडीओत कैद झाली आहे. व्हिडीओच्या शेवटी, अग्निशमन कर्मचारी यशस्वी प्रयत्नानंतर आनंद साजरा करताना दिसतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, युजर्सचे हसू थांबत नाही. अनेकांनी या घटनेवर मजेशीर प्रतिक्रिया देत कमेंट्स केल्या आहेत.

Viral Video
Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! 13व्या मजल्यावरुन पडला तरी वाचला, थरारक व्हायरल VIDEO समोर

महिलेची नाकातील अंगठी खुर्चीत अडकण्याच्या घटनेचा व्हिडीओ पाहून युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, "पण अशा खुर्चीवर कोण बसते, तेही ऑफिसमध्ये." दुसऱ्याने मजा घेत लिहिले, "फायरमॅनने महिलेला वाईटरित्या ट्रोल केले." तिसऱ्याने म्हटले, "वेदना खूप आहेत, पण जगाची लाज झाली आहे." तर आणखी एक युजर म्हणाला, "फायरमॅननेही याचा आनंद घेतला." या विचित्र प्रसंगाने सोशल मीडियावर चर्चा आणि हास्याचा माहोल निर्माण केला आहे.

Viral Video
Pune Metro Station: अबब...! पुण्यात आहे सात मजली मेट्रो स्टेशन, व्हायरल VIDEO पाहिलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com