Sanjay Manjrekar Statement on Gambhir  Google
क्रीडा

Sanjay Manjrekar: खेळ आणि संघापेक्षा मोठे काहीही नाही; गंभीरसंदर्भात संजय मांजरेकरांचे मोठं विधान

Sanjay Manjrekar Statement on Gambhir : संजय मांजरेकर यांनी गौतम गंभीरबाबत मोठे विधान केलंय. त्याच्या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. खेळ आणि संघापेक्षा मोठं काहीच नसल्याचं मांजरेकरने म्हटलंय.

Bharat Jadhav

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर पहिल्या मालिकेला सामोरे जात आहे. गंभीरच्या नेतृत्वाखील आज भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. गौतम गंभीर जेव्हापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला तेव्हापासून आजपर्यंत टीम इंडियाला गौतम गंभीरपेक्षा मोठा प्रशिक्षक मिळाला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरुन भारताच्या माजी क्रिकेटर संजय मांजरेकरने गंभीरवर निशाणा साधलाय.

कोणीही संघापेक्षा मोठा असू शकत नाही. मांजरेकर यांनी खेळाडू आणि प्रेक्षपण करणाऱ्यांना विनंती केलीय की, हा खेळ काय आहे याबद्दल बोलावं, संघाबद्दल बोलावं. पण कोणत्या व्यक्तीबद्दल बोलू नये. संजय मांजरेकरांच्या या विधानामुळे गौतम गंभीरच्या चाहत्यांची मने दुखावू शकतात.

गौतम गंभीरसाठी हे निश्चितच आव्हान असेल. कारण गेल्या दोन दशकांत भारताचा सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून पाहिले गेलेल्या राहुल द्रविडची जागा तो घेणार आहे. द्रविडने टीम इंडियाला T20 विश्वचषक जिंकून दिलाय. तर त्याच्या विजयाची टक्केवारी आधीच्या सर्व प्रशिक्षकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. टीम इंडियाने चारवेळा विश्वचषक जिंकलाय आहे आणि फक्त दोन वेळाच महान प्रशिक्षक संघासोबत होत, असं मांजरेकर म्हणालेत.

संजय मांजरेकर यांनी एक्सवर पोस्ट केलीय. कोणी प्रशिक्षक नाही. लालचंद राजपूत, गॅरी कर्स्टन आणि राहुल द्रविड प्रशिक्षक होते . त्यावेळी भारतीय संघाने १९८३, २००७, २०११ आणि २०२४ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. हे खरोखर भारतीय क्रिकेटबद्दल आहे, प्रशिक्षक कोण आहे हे नाही. दोघांमध्ये थेट संबंध आहे असा विचार करणे थांबवण्याची वेळ आली आहे असल्याचं मांजरेकर म्हणाले. "कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ मध्ये दोनवेळा चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता.

त्यावेळी संघाला मुख्य प्रशिक्षक नव्हता. तर जेव्हा टीम इंडिया २००७ मध्ये T२० विश्वचषक चॅम्पियन बनली, तेव्हा लालचंद राजपूत संघाचे संचालक होते. कारण ६ महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर ग्रेग चॅपेलला हटववण्यात आलं होतं. त्यानंतर २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान विजेत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन होते.

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून टीमसोबतचीही ती पहिलीच वेळ होती. यानंतर २०२४ मध्ये हे घडले आहे, जेव्हा मुख्य प्रशिक्षक संघासोबत होते आणि संघ वर्ल्ड चॅम्पियन बनला होता. त्यामुळे गौतम गंभीरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण भारताला आगामी काळात आयसीसीच्या अनेक स्पर्धा जिंकायच्या असल्याचं मांजेकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT