Sania Mirza Saam Tv
Sports

Sania Mirza Confirms Retirement : सानिया मिर्झाचा मोठा निर्णय, टेनिसमधून संन्यास; अखेरचा सामना कुठे खेळणार?

सानियाने टेनिस करिअरला गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे सानियाने हा निर्णय घेतला आहे.

वृत्तसंस्था

Sania Mirza Retirement Announcement : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने एक मोठी घोषणा केली आहे. सानियाने तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया शेवटचा सामना खेळणार आहे. दुखापतीमुळे सानियाने हा निर्णय घेतला आहे.

ही चॅम्पियनशिप सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. दुबई टेनिस चॅम्पियनशिप 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. WTA 1000 स्पर्धेतील दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया आपला शेवटचा सामना खेळणार आहे.

36 वर्षीय सानिया मिर्झा ही दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर 1 राहिली आहे. सानियाने गेल्या वर्षीच ती 2022 च्या अखेरीस निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. सानिया मिर्झा या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून निवृत्त होणार आहे. 

सानियाने हे पुरस्कार आणि विजेतेपद पटकावले आहेत

सानिया मिर्झाला अर्जुन पुरस्कार (2004), पद्मश्री पुरस्कार (2006), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2015) आणि पद्मभूषण पुरस्कार (2016) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत 6 मोठे चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.

ऑस्ट्रेलियन ओपन (2016), विम्बल्डन (2015) आणि यूएस ओपन (2015) दुहेरीत विजेतेपद पटकावले आहेत. याशिवाय तिने मिश्र दुहेरीत तीन ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन (2009), फ्रेंच ओपन (2012) आणि यूएस ओपन (2014) विजेतेपदेही जिंकली आहेत.

2010 मध्ये शोएब मलिकसोबत लग्न

2010 मध्ये सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. या दोघांच्या लग्नाबाबत सध्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सानिया मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, निवृत्तीनंतर सानिया मिर्झाने तिच्या टेनिस अकादमीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे बोलले जाते आहे. सानियाने हैदराबादमध्ये टेनिस अकादमीही सुरू केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

Maharashtra Live News Update : पुणे महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

SCROLL FOR NEXT