Mohammed Shami IPL yandex
Sports

IPL 2024 : मोहम्मद शमीच्या जागी गुजरात टायटन्सने आणला दुसरा गोलंदाज, कोण आहे गुजरातचा नवा भिडू?

Gujarat Titans New Player : गुजरात टायटन्स फ्रँचायझीने मोहम्मद शमीच्या जागी दुसऱ्या एका गोलंदाजीची घोषणा केलीय. दुखापतग्रस्त शमीच्या जागी फ्रँचायझीने या वेगवान गोलंदाजाला ५० लाख रुपयांमध्ये सामील केले आहे. शमीच्या उजव्या टाचेवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

Gujarat Titans Sandeep Warrier Replacement For Mohammed Shami :

गुजरात टायटन्सने आयपीएल २०२४ साठी जलद गती गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागेवर नवीन एका गोलंदाजाला संघात समावून घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापूर्वी शमीच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती.त्यामुळे शमी अजून पूर्णपणे फीट होण्यास अजून वेळ आहे. मोहम्मद शमी नसल्याने संघाने त्याची रिप्लेसमेंट संदीप वॉरियरने केलीय. (Latest News)

दरम्यान मागील वर्षी शमाीने एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. परंतु त्यानंतर शमी टाचेच्या दुखण्यामुळे खेळाच्या मैदानापासून दूर राहिलाय. आता झालेल्या इंग्लंडविरुद्ध भारताच्या सामन्यांमध्येसुद्धा शमी दिसला नव्हता. दरम्यान गुजरात टायटन्सचा पहिला सामना मु्ंबई इंडियन्सच्या विरुद्धात असेल, हा सामना २४ मार्च रोजी खेळला जाणार आहे. आयपीएलची गव्हर्निग बॉडी नुसार, गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीच्या जागी संदीप वॉरियरला संघात घेतलं आहे.

संदीपने आतापर्यंत ५ आयपीएल सामने खेळले आहेत. त्याला बेस प्राईस ५० लाख रुपयात खरेदी करण्यात आले आहे. संदीप वॉरियर आतापर्यंत कोलकत्ता नाइटरायडर्सकडून ५ आयपीएल सामने खेळले आहेत. आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघातही तो होता. संदीप याआधी २०१९ ते २०२१ पर्यंत केकेआरसह होता.

मोहम्मद शमीच्या दुखापतीवर लंडनमध्ये नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचे अपडेट त्यांनी सोशल मीडियावर दिले. तो नुकताच भारतात परतलाय. शमी एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला. शमी हा गुजरात टायटन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला संघातून वगळणे हा फ्रेंचायझीसाठी मोठा धक्का आहे. यावेळी गुजरात टायटन्सचा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे.

IPL ओपनिंग सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना?

आयपीएल २०२४ स्पर्धेची सुरुवात साऊदर्न डर्बीच्या सामन्याने होणार आहे. हा सामना पाहण्यासाठीचं सर्वात स्वस्त तिकीट १७०० रुपयांना आहे. तर अपर सी,डी, इ,आय, जे आणि के सेक्शनच्या तिकीटांची किंमत ही ४००० ते ७५०० च्या घरात आहे. यासह व्हीआयपी तिकीटं देखील असणार आहेत. मात्र हे तिकीटं अजूनपर्यंत विक्रीसाठी काढण्यात आलेली नाहीत. पेटीएम इन्साइडरने दिलेल्या माहितीनुसार, एका वेळी केवळ २ तिकीटं बुक करता येणार आहेत. तर बुक माय शोवर बुकिंग थेट बंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT