kolkata knight riders winning ipl trophy saam tv news
क्रीडा

IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

KKR vs SRH, IPL 2024 Final: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

>प्रसाद जगताप

एकसारखा स्कोर, एकसारखं रन चेस, एकसारख्या विकेट ठेवून मिळवलेला एकहाती विजय, एकाच देशाच्या कॅप्टन्सला इंडीयन कॅप्टनने दिलेली धोबीरपछाड. वुमेन्स प्रिमिअर लिगची फायनल आणि आयएपीलच्या फायनल मॅचमध्ये हे योगायोग पाहून तुम्हीही चक्रावून जाल. हे खरंच योगायोग आहेत की मग ठरवून लिहलेली स्क्रीप्ट? असे प्रश्न आयपीएलच्या फायनलवरुन आता विचारले जाता आहेत. कारण दोन वेगवेगळ्या फायनल मॅच मध्ये इतकं साम्य पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. आयएपीएलच्या मेन्स फायनलचं काय आहे वुमेन्स प्रिमिअर लिगच्या फायनलशी कनेक्शन? जाणून घ्या.

वुमेन्स प्रिमिअर लिगची फायनल 17 मार्च 2024 रोजी पार पडली. ही फायनल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये झाली. ज्यात दिल्लीने पहिले बॅटींग करत 18.3 ओव्हर्समध्ये 113 धावा केल्या. ज्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 गडी राखत सहज पूर्ण करत वुमेन्स प्रिमिअर लिगचा खिताब पटकावला..

या फायनलच्या 3 महिन्यानंतर म्हणजे 26 मे 2024 ला आयपीएलची फायनल झाली. ही फायनल सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये झाली. यातही हैदराबादने पहिले बॅटींग करत 18.3 ओव्हर्समध्ये बरोबर 113 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने बरोबर 8 खेळाडू राखत सहज पूर्ण केल्या आणि आयपीएल 2024चा खिताब पटकावला..

विचार करण्याची बाब म्हणजे, २ वेगवेगळ्या लिग,२ वेगवेगळ्या टीम्स, २वेगवेगळी ठिकाणं, २ वेगवेगळे मैदान पण, दोघांचे परिणाम अगदी सारखे. असं कसं काय? हा खरचं योगायोग आहे की ठरवून लिहलेली स्क्रिप्ट? असे कितीतरी प्रश्न आता क्रिकेट प्रेमींकडून विचारले जात आहेत. कारण फक्त हेच योगायोग आहेत असं नाही.याव्यतिरीक्त अजूनही कित्येक योगायोग आहेत. ते योगायोग काय तेही पाहुयात..

दोन्ही विजेत्या संघांचे कर्णधार भारतीय होते. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कर्णधार स्मृती मंधाना होती. म्हणजे दोन्ही भारतीय. आता दोन्ही पराभूत संघांचे कर्णधारही एकाच टीमचे म्हणजे ऑस्ट्रेलियन होते. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची मेग लेनिंग म्हणजे दोन्ही ऑस्ट्रेलियन. पहिले बॅटींग करताना ऑस्ट्रेलियन कॅप्टनच्या दोन्ही टीम्स ऑलआइट झाल्या. दोन्ही टीमने बरोबर 18.3 ओव्हरमध्ये 113 धावा केल्या चेस करणाऱ्या भारतीय कर्णधाराच्या टीम्सने हे टार्गेट बरोबर 8 विकेट राखत पूर्ण केलं..

इतके सगळे योगायोग आयपीएलच्या दोन फायनलमध्ये एकाच वर्षात फक्त तीन महिन्यांच्या अंतराने पहायला मिळाले. म्हणून यावरुन आता क्रिकेट चाहते हे योगायोग आहेत की जाणूनबुजून लिहलेली स्क्रिप्ट? असा प्रश्न विचारतायेत. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करुन नक्की कळवा..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT