Saketh Myneni Ramkumar Ramanathan won silver in mens tennis doubles in asian games 2023  Saam tv
क्रीडा

Asian Games 2023: साकेथ मायनेनी,रामकुमार रामनाथन जोडीची कमाल;टेनिस डबल्समध्ये भारताला रौप्यपदक

Ankush Dhavre

Asian Games 2023 Day 6:

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस डबल्समध्ये साकेथ मायनेनी,रामकुमार रामनाथन यांच्या जोडीने कमाल कामगिरी केली. मात्र अंतिम सामन्यात या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पुरुषांच्या टेनिस डबल्समध्ये साकेथ मायनेनी रामकुमार रामनाथन यांच्या जोडीला चीनी ताईपैच्या जंग जेसन आणि हसू यू-ह्सिओ या जोडीने ६-४,६-४ ने पराभूत केलं आहे.

तब्बल १ तास आणि १२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय संघ सुवर्णपदकावर नाव कोरणार असं वाटत होतं, मात्र सलग सेट जिंकत ताइपेच्य खेळाडूंनी सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

पलक, ईशा सिंग चमकले..

महिलांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी गेल्याचे पाहायला मिळाले आहे. या प्रकारात भारतीय नेमबाज पलकने २४२.१ गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तर ईशा सिगंने २३९.७ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं आहे. (Latest sports updates)

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताची पदकांची संख्या..

एकुण पदकं- ३०

सुवर्ण- ८

रौप्य -११

कांस्य- ११

सुवर्णपदक- ५० मीटर रायफल ३ पी (पुरुष,सांघिक)

रौप्यपदक - १० मीटर एयर पिस्तूल (महिला, सांघिक)

रौप्यपदक- टेनिस पुरुष दुहेरी

सुवर्णपदक - पलक ( १० मीटर एयर पिस्तूल, महिला)

रौप्यपदक- ईशा सिंग (१० मीटर एयर पिस्तूल)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT