sachin tendulkar twitter
क्रीडा

Sachin Tendulkar: धारदार गोलंदाजी अन् आक्रमक फलंदाजी! वयाच्या ५० व्या वर्षीही मास्टर ब्लास्टरचा 'जलवा' कायम

Sachin Tendulkar Batting And Bowling: सचिन तेंडुलकर निवृत्त होऊन १० वर्ष झाली असले तरीदेखील त्याच्या फलंदाजीची जादू आणि गोलंदाजीची धार काही कमी झालेली नाही

Ankush Dhavre

Sachin Tendulkar Latest News In Marathi:

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला होता. निवृत्त होऊन १० वर्ष झाली असले तरीदेखील त्याच्या फलंदाजीची जादू आणि गोलंदाजीची धार काही कमी झालेली नाही. १८ जानेवारी रोजी कर्नाटकमध्ये झालेल्या वन वर्ल्ड वन फॅमिलीच्या सामन्यात सचिन गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार खेळ करताना दिसून आला आहे.

सचिनची जादुई गोलंदाजी..

सचिनने या २० षटकांच्या सामन्यात २ षटक गोलंदाजी केली. त्याची गोलंदाजी पाहून क्रिकेट चाहत्यांना जुने दिवस नक्कीच आठवले असतील. त्याने आपल्या गोलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना निराश केलं नाही. त्याने २ षटकात २३ धावा खर्च केल्या आणि १ फलंदाजाला बाद केलं. त्याने आक्रमक फलंदाजी करत असलेल्या डॅरेन मॅडीला ५१ धावांवर बाद करत तंबूत धाडलं. (Cricket news In marathi)

सचिनची कारकिर्द..

सचिन तेंडुलकर हा भारताचा दिग्गज फलंदाज आहे. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावण्याची नोंद आहे. असा कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २०० कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ५३.८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत.यादरम्यान त्याने ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकं झळकावली आहेत.

तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ४६३ वनडे सामन्यांमध्ये ४४.८ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकं झळकावली आहेत. फलंदाजीसह गोलंदाजीतही त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना ४६ तर वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना १५४ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT