Sachin Tendulkar Meet Amir Hussain 
Sports

Sachin Tendulkar Post: रिअल हिरो! सचिनची काश्मीरच्या दिव्यांग क्रिकेटरची भेट; क्रिकेटच्या देवाला पाहून अमीर भारावला

Sachin Tendulkar Meet Amir Hussain: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सचिन तेंडूलकरने नुकतीच दिव्यांग क्रिकेटर अमीर हुसेनची भेट घेतली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sachin Tendulkar Meet Differently Abled Cricketer Amir Hussain:

क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर म्हणून सचिन तेंडूलकर ओळखला जातो. सचिन तेंडूलकर सध्या काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सचिन तेंडूलकरने काश्मीरमध्ये दिव्यांग क्रिकेटपट्टू अमीर हुसेनची भेट घेतली आहे. याचाच व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Latest News)

सचिन तेंडूलकरने हुसेनची भेट घेऊन कौतुक केले आहे. रिअल हिरो, असाच प्रेरित करत राहा, तुम्हाला भेटून आनंद झाला असे कॅप्शन त्याने दिले आहे. सचिनने अमिरला घट्ट मिठी मारुन त्याचे खूप कौतुक केले आहे. सचिनने अमिरला त्याचा ऑटोग्रॉफ असलेले बॅट भेटवस्तू म्हणून दिली आहे. या बॅटवर रिअल हिरो, असाच प्रेरित करत राहा, असं लिहले आहे. त्यानंतर अमिर सचिनची पत्नी आणि मुलगी साराला भेटतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अमीर हा बिजबोहाराच्या वाघामा गावात राहतो. तो एक दिव्यांग क्रिकेटर आहे. अमीर सध्या जम्मू काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाच्या कर्णधार आहे. सचिनने याआधीही एकदा अमीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

सचिनच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी अमिरच्या उत्तम कामगिरीसाठी त्याचे खूप कौतुक केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT