Prithvi Shaw : पृथ्वी शॉची बॅट तळपली; रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, तेंडूलकर, गावस्करांनाही टाकलं मागे

मुंबई संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने आसामविरुद्धच्या सामन्यात ३७९ धावांची खेळी केली.
Prithvi Shaw Latest News
Prithvi Shaw Latest NewsSaam TV
Published On

नवी दिल्ली : युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, तरी देखील त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. यंदा सुरू असलेल्या रणजी हंगामात त्रिशतक झळकावून त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह पृथ्वी शॉने महान फलंदाज सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर यासारख्या दिग्गज खेळाडूंना देखील मागे टाकलं आहे. (Sports News)

Prithvi Shaw Latest News
Rishabh Pant Updates : ऋषभ पंत IPL 2023 खेळणार? सौरव गांगुलीने स्पष्टचं सांगितलं

मुंबई संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने आसामविरुद्धच्या सामन्यात ३७९ धावांची खेळी केली. यासह पृथ्वी शॉ हा भारतीय प्रथम श्रेणी आणि रणजी इतिहासातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने संजय मांजरेकरचा विक्रम मोडला आहे. मांजरेकर यांनी 1991 मध्ये हैदराबाद विरुद्ध मुंबई 377 धावा केल्या होत्या. (Indian Cricket Team)

रणजी हंगामातील सामना मुंबई विरुद्ध आसाम हा सामना गुवाहाटी येथील अमीनगाव क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यांत पृथ्वी शॉने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला आहे. पृथ्वी शॉ ने 383 चेंडूत 379 धावा फटकावल्या. टेस्ट मॅचमध्ये त्याने पूर्णपणे वनडे स्टाइल बॅटिंग केली. या खेळी दरम्यान पृथ्वीने 49 चौकार आणि 4 सिक्स मारले.

Prithvi Shaw Latest News
IND vs SL 1st ODI: टीम इंडियाचा श्रीलंकेवर 67 धावांनी दणदणीत विजय; मालिकेत 1-0 ने आघाडी

आपल्या या अप्रतिम खेळीमुळे पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्येही अनोखा विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक, विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक आणि रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. सध्या, गेल्या एक वर्षापासून पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.

दरम्यान, पृथ्वी शॉचा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम हुकला. तो 379 धावांवर एलबीडब्यू बाद झाला. त्यामुळे रणजी सामन्यांत सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम निंबाळकर यांच्या नावावरच राहिला. निंबाळकर यांनी 1948-49 मध्ये महाराष्ट्राकडून खेळताना काठीवाडविरुद्ध 4430 धावांची नाबाद खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com