Sachin Tendulkar double hundred in ODI creat history SAAM TV
क्रीडा

Sachin Tendulkar double hundred : सचिन तेंडुलकरनं आजच्या दिवशीच रचला होता इतिहास, वनडेमध्ये ठोकलं पहिलंच द्विशतक, VIDEO

Sachin Tendulkar record : सचिन तेंडुलकर यानं १४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला होता.

Nandkumar Joshi

Sachin Tendulkar double hundred in ODI Cricket :

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानं १४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला होता. २०१० मध्ये आजच्या दिवशीच सचिनने ग्वाल्हेरच्या मैदानात धावांचा पाऊस पाडला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना नाबाद २०० धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील (पुरूष) पहिले द्विशतक होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वनडेची सुरुवात ५ जानेवारी १९७१ रोजी झाली होती. सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar double hundred) जवळपास चार दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणली होती. सचिनच्या आधी चार्ल्स कोवेंट्री आणि सईद अन्वर हे फलंदाज द्विशतकाच्या जवळ पोहोचले होते. मात्र, २०० धावा पूर्ण करू शकले नव्हते. सचिनने द्विशतक झळकावल्यानंतर अनेक खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये हा मैलाचा दगड पार केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सचिन तेंडुलकरची फलंदाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. अवघ्या १४७ चेंडूंत नाबाद २०० धावा त्याने केल्या होत्या. सचिनच्या या ऐतिहासिक खेळीत २५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सचिनने वनडेत सईद अन्वर आणि कोवेंट्री (१९४ धावा) यांचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला होता.

भारतानं १५३ धावांनी जिंकला होता सामना

सचिन याने लँग्वेल्टच्या चेंडूवर एक धाव घेत ऐतिहासिक द्विशतक पूर्ण केले होते. या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३ गड्यांच्या बदल्यात ४०१ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका संघ २४८ धावांवर गारद झाला होता. भारताने १५३ धावांनी हा सामना जिंकून मालिकाही खिशात घातली होती.

२४ फेब्रुवारीला ख्रिस गेलनंही द्विशतक झळकावलं

विशेष म्हणजे २४ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल यानेही द्विशतक झळकावलं होतं. गेल याने २०१५ रोजी वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेच्या विरुद्ध हा कारनामा केला होता. गेल याने १४७ चेंडूंत १० चौकार आणि १६ षटकारांच्या मदतीने २१५ धावा कुटल्या होत्या. गेल याने फक्त १३८ चेंडूंत द्विशतक ठोकलं होतं.

वनडेत १० फलंदाजांनी झळकावलंय द्विशतक

आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये आतापर्यंत १० फलंदाजांनी द्विशतक झळकावले आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, इशान किशन, शुभमन गिल यांनी हा कारनामा केला आहे. तर विदेशी फलंदाजांमध्ये पथुम निसंका, ग्लेन मॅक्सवेल, फखर जमां, मार्टिन गप्टिल, ख्रिस गेल यांनी द्विशतकी खेळी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT