मुंबई : उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होणा-या १२ व्या जागतिक शरीरसाैष्ठव स्पर्धेसाठी world bodybuilding championships भारतीय संघात महाराष्ट्रातील सचिन पाटील sachin patil, सुजन पिळणकर sujan pilankar, सुभाष पुजारी subhash pujari यांची निवड झाली आहे. या संघात एकूण ७७ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघाच्या तयारीबाबतची माहिती भारतीय शरीरसौष्ठव संघटनेच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी दिली. sachin-patil-sujan-pilankar-subhash-pujari-in-indian-squad-for-world-bodybuilding-championship-sml80
शेठ म्हणाले गतवर्षापासून काेविडच्या महामारीमुळे १२ वी जागतिक शरीरसौष्ठव bodybuilding स्पर्धा सातत्याने पुढे ढकलण्यात येत हाेती. यंदा मात्र जागतिक शरीरसौष्ठव संघटनेच्या प्रयत्नांमुळे ही स्पर्धा उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात हाेईल.
शरीरसौष्ठवाच्या प्रमुख गटात कुंदन गोपे, रामकृष्ण, इ कार्तिक, समीरं नंदी, मोहम्मद अश्रफ, जावेदअली खान, मास्टर गटात महाराष्ट्राचा सुभाष पुजारी, बोरून यमनम, बलदेव कुमार, महिलांच्या गटांत भाविका प्रधान झरना राय, करिष्मा चानू सुप्रतिक अर्चर्जी या खेळाडूंकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. याबराेबरच मॉडेल फिजिक गटात अनिल सती, मनिकंदन, स्वराज सिंग हे देशाचे प्रतिनिधित्व करतील.
महाराष्ट्रातील अलिबागचा सचिन पाटील हा या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहे. ताे फिटनेस फिजीक गटासाठी तयार आहे. याबराेबरच तो ऍथलिट फिजीक या प्रकारातही आपले कसब दाखवेल. याबराेबरच माजी मुंबई श्री विजेता सुजन पिळणकरही ८५ किलो वजनीगटात आपले कसब पणाला लावणार आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.