सिंधूदूर्ग : चिपी विमानतळाचे उदघाटन नऊ आॅक्टाेबरला हाेईल अशी माहिती केंद्रिय मंत्री नारायणे राणे यांनी मंगळवारी (ता.७) दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. दरम्यान आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी येत्या सात आॅक्टाेबरपासून विमानसेवा सुरु हाेणार असल्याचे स्पष्ट करुन ज्या गाेष्टी माहिती नाहीत त्याबाबत फुशारक्या मारु नका असा टाेला नारायण राणेंना लगावला आहे. खासदार राऊत यांनी चिपी विमानतळ सुरु होण्याबाबतची माहिती आज (बुधवार) पत्रकार परिषद देत असतानाच राणेंवर सडकून टीका केली.
राऊत म्हणाले सिंधुदुर्ग विमानतळ हे आैद्याेगिक वसाहतीच्या मालकीचे आहे आहे. केंद्र सरकार हे केवळ परवानागी देत आहे. जे फुशारकी करत किंवा जे बडेजाव मारत आहेत त्यांनी लक्षात असले पाहिजे मुख्यमंत्र्यांना बोलावयची गरज नाही हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हांला काय अधिकार आहे सांगायचा? जर तुम्हाला माहिती नसेल तर शिकून घ्या, काही जणांकडून. अगदीच माहिती नसेल तर अमित शहांकडून amit shah यांच्याकडून शिकून घ्या. ते टिंगू मिंगू पण आता बडेजाव मारायला लागलेत बाप असावा तर असा. बाप असला पाहिजे पण आयत्या बिळातला नागोबा असता कामा नये असा टाेलाही राऊतांनी राणेंना मारला. ते म्हणाले नारायण राणेंना narayan rane vinayak raut या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही.
दरम्यान चिपळूण-पिरोळे विमानतळासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांनी विमानतळाच्या पुर्णत्वासाठी सातत्याने केंद्राकडे पाठपूरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून येथील हवाई वाहतुकीस ग्रीन सिग्नल मिळाल्याने फुशारक्या मारणा-यांनी पहिली व्यवस्था समजून घ्यावी असा टाेला खासदार राऊतांनी राणेंना मारला.
edited by : siddharth latkar