kane williamson twitter
Sports

SA vs NZ: विलियम्सन- रचिनचं शतक; फिलिप्सकडून गोलंदाजांची बत्तीगुल,न्यूझीलंडने केल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च धावा

South Africa vs New Zealand 1st Inning: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसऱ्या सेमीफायनमध्ये न्यूझीलंडने या स्पर्धेतील सर्वोच्च धावा केल्या आहेत.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना करण्यासाठी मैदनात उतरणार आहेत.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल. दरम्यान रचिन रविंद्र आणि केन विलियम्सनच्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ५० षटकअखेर ३६२ धावांचा डोंगर उभारला आहे. तर दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी ३६३ धावांची गरज आहे.

या मैदानावर आतापर्यंत ३५० हून अधिक धावांचा डोंगर उभारला गेला आणि त्या धावांचा यशस्वी पाठलाग देखील केला गेला आहे. त्यामुळे न्यूझीलंडने आधी फलंदाजीला जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. न्यूझीलंडला सुरुवातीला मोठा धक्का बसला.

सलामीला फलंदाजीला आलेला विल यंग अवघ्या २१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर इथून दक्षिण आफ्रिकेला सामन्यावर पकड बनवण्याची संधी होती. मात्र रचिन रविंद्र आणि केन विलियम्सनने मिळून डाव सावरला. दोघांनी शतकी भागीदारी केली आणि न्यूझीलंडला मजबूत स्थितीत पोहोचवलं. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना दोघांनाही बाद करण्याची संधी मिळाली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत.

विलियम्सन- रविंद्रचं शतक

या डावात फलंदाजी करताना केन विलियम्सन आणि रचिन रविंद्रने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रचिनने १०१ चेंडूंचा सामना करत १०८ धावांची खेळी केली. तर केन विलियम्सनने ९४ चेंडूंचा सामना करत १०२ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून जवळपास १५० हून अधिक धावा जोडल्या. हे दोघे ज्यावेळी फलंदाजी करत होते, त्यावेळी न्यूझीलंड ३५० च्या पुढे जाणार की काय असं वाटू लागलं होतं. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी या दोघांना बाद करत कमबॅक करुन दिलं.

शेवटच्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमदार फलंदाजी

सुरुवात चांगली झाल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्येही दमदार फलंदाजी केली. शेवटी डॅरील मिशेलने ४९ धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेसवेल १६ धावा करत माघारी परतला. तर ग्लेन फिलिप्सने वादळी अर्धशतकी खेळी केली. यासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT