
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. तब्बल २९ वर्षांनंतर पाकिस्तानला कुठल्याही आयसीसीच्या स्पर्धेचे यजमानपद भुषणवण्याची संधी मिळाली होती. मात्र पाकिस्तानने या संधीची माती केली.
साखळी फेरीतील २ सामने गमावले आणि १ सामना पावसामुळे धुतला गेला. त्यामुळे यजमान पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला. तर दुसरीकडे भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान याचं पाकिस्तानला खूप मोठं नुकसान होऊ शकतं.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने पाकिस्तानला या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी ५८६ कोटी रुपयांचं बजेट दिलं होतं. या स्पर्धेत एकूण १५ सामने खेळले जाणार होते. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी ३९ कोटी रुपये बजेट ठरवण्यात आला होता. भारतीय संघाचे ३ साखळी फेरीतील आणि १ सेमीफायनलचा सामना दुबईत खेळवण्यात आला आहे.
आयसीसीने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार, या स्पर्धेतील चारही सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार होते. मात्र हे चारही सामने दुबईत खेळवले गेल्यामुळे पीसीबीचं १५६ कोटींचं नुकसान झालं आहे. भारतीय संघाने फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री केली आहे. त्यामुळे फायनलचा सामना देखील दुबईत खेळवला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानचं आतापर्यंत १९५ कोटींचं नुकसान झालं आहे.
पाकिस्तानला २९ वर्ष वाट पाहिल्यानंतर आयसीसी स्पर्धेच्य सामन्यांचं आयोजन करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे पाकिस्तानने स्टेडियमचं नुतणीकरण केलं. या स्टेडियमला नव्याने बनवण्यासाठी एकूण ५०० कोटींचा बजेट ठरवण्यात आला होता. पीसीबीला वाटलं होतं की, हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षेक तुफान गर्दी करतील.
पण असं काहीच झालं नाही. प्रेक्षकांनी मैदानात येऊन सामने पाहण्याला पाठ फिरवली. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे,ज्या सामन्यात प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली, ते सामने पावसामुळे धुतले गेले. असं एकदा नाहीतर दोनदा घडलं. रावलपिंडीमध्ये नाणेफेक न होताच सामने रद्द झाले, त्यामुळे पीसीबीवर प्रेक्षकांचे पैसे परत करण्याची वेळ आली. त्यामुळे पीसीबीची घेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं, अशीच गत झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.