SA vs BAN, T20 World Cup 2024 ICC Twitter
Sports

SA vs BAN Highlights : दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर ४ धावांनी विजय; केशव महाराजने शेवटच्या षटकात फिरवला सामना

SA vs BAN, T20 World Cup 2024 : प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद केवळ ११३ धावाच केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेशची चांगलीच दमछाक झाली.

Satish Daud

टी-२० वर्ल्डकपमध्ये अतिशय रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीचा अंदाज येत नसल्याने मोठमोठ्या संघांची गोची होत आहे. त्यामुळे सुपर ८ फेरीत दाखल होण्यासाठी चांगलीच चुरस रंगली आहे. रविवारी क्रिकेटप्रेमींना भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळाला होता. या थराराची चर्चा रंगली असतानाच आता आणखी एक चुरशीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशवर अगदी शेवटच्या षटकात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद केवळ ११३ धावाच केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेशची चांगलीच दमछाक झाली.

अगदी पहिल्या षटकापासून बांग्लादेशला एकापाठोपाठ एक धक्के बसण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर बांग्लादेशी खेळाडूंनी अतिशय सावध फलंदाजी केली. अखेरच्या षटकात बांग्लादेशला ११ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूवर त्यांना चार धावाही मिळाल्या. मात्र, नंतरच्या ४ चेंडूवर त्यांना ७ धावा करणे अशक्य झाले.

परिणामी दक्षिण आफ्रिकेने हा सामना ४ धावांची आपल्या खिशात घातला. हातातील सामना गमावल्यानंतर बांग्लादेशी खेळाडूंच्या चेहऱ्यावर अत्यंत निराशा दिसत होती. या विजयासह आफ्रिकेने आपल्या गटातून सुपर ८ फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. दुसरीकडे बांग्लादेशला प्रवेशासाठी उर्वरित सामने जिंकावे लागणार आहे.

दक्षिण आफ्रिका-बांग्लादेश सामन्याचा धावता आढावा

  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केवळ ११३ धावा केल्या.

  • आक्रिकेकडून क्लासेनने ४६ आणि डेव्हिड मिलरने २९ धावांची चिवट खेळी केली.

  • बांग्लादेशकडून तनझिम हसन साकिबने ३ विकेट्स घेतल्या. तस्कीन अहमदने २ गड्यांना बाद केलं.

  • ११३ धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ केवळ १०९ धावाच करू शकला.

  • बांग्लादेशकडून तौहीद हृदयाने ३७ धावांची खेळी केली. तर महमुदुल्लाहने २० धावा केल्या.

  • आफ्रिकेकडून केशव महाराजने ३ विकेट्स घेतल्या. नॉर्कियाने २ गड्यांना बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT